न्याय व हक्कासाठी पारधी बांधवांची पदयात्रा; आजंती ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक नेर तालुक्यातील आजंती खाकी येथील पारधी बांधवांनी मालकी हक्क, मूलभूत सुविधा व विशेष महसूल गावाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आजंती ते यवतमाळ अशी पदयात्रा सुरू केली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दीपस्तंभ आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष बबन मंग्या पवार, उपाध्यक्ष राज राठोड व सचिव मिनेश घोसले यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. आजंती खाकी येथील गट क्रमांक १९ मधील शासकीय जमिनीवर मागील ३० ते ३५ वर्षांपासून सुमारे ५० ते ५६ कुटुंबे वास्तव्यास असून त्यांना अद्याप मालकी हक्क मिळालेला नाही. तसेच पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, घरकुल योजना व इतर मूलभूत सुविधांसाठी सातत्याने संघर्ष करावा लागत असल्याचे पदयात्रेदरम्यान सांगण्यात आले. निवेदनानुसार, संबंधित जमीन ई-क्लास गायरान व सराईसाठी राखीव असली तरी अनेक वर्षांपासून येथे कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकूल करून मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावेत, आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच आजंती खाकीला विशेष महसूल गावाचा दर्जा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार पदयात्रेतील सहभागी बांधवांनी व्यक्त केला. यावेळी अनाडी घोसले, इनून पवार, नितेश घोसले, सनी पवार, युवराजसिंग घोसले आदी उपस्थित होते. न्याय, हक्क आणि मूलभूत सुविधांसाठी सुरू झालेल्या या पदयात्रेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून पारधी समाजाच्या मागण्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- MIDC परिसरातील 13 थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्तीनामा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.1
- आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.1
- एआयएमआयएम (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, "तू थकून जाशील, पण हिंदुस्तानचा मुसलमान थकणार नाही." ओवैसींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे समर्थक याला मुस्लिम समुदायाच्या धैर्याची आणि हक्कांची भावना व्यक्त करणारा आवाज म्हणून पाहत आहेत, तर विरोधक याला निव्वळ राजकीय वक्तव्य संबोधत आहेत. या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत.1
- अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रशासनाच्या भव्य उपक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या हजारोंच्या सहभागातून योगाचा महत्त्वपूर्ण संदेश सर्वत्र पोहोचवण्यात आला.1
- अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.1
- २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.2
- ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी ६ व्या व ७ व्या वर्गांची पटसंख्या २५-३० पर्यंत पोहोचल्यामुळे या दोन्ही वर्गांची वाढ करण्याची मागणी केली आहे.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.1