आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा' पुन्हा सुरू करा; पिंपरी-चिंचवड भाजयुमोची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा' पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापौर रवी लांडगे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना गुरुवारी विशेष निवेदन देण्यात आले. शहराला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला असून, महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळत असे. मात्र, सन २०१९ मध्ये ही स्पर्धा शेवटची घेण्यात आली होती आणि त्यानंतर ती प्रलंबित असल्याने शालेय खेळाडूंमध्ये निराशेचे वातावरण आहे. या निवेदनाद्वारे भाजयुमोने प्रशासनाचे लक्ष वेधताना स्पर्धेचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे. स्पर्धेचे व्यापक नियोजन करून शहरातील सर्व खाजगी व महानगरपालिका शाळांना यामध्ये सहभागी करून घेऊन स्पर्धेची व्याप्ती वाढवावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना उत्तम दर्जाची मैदाने, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सोयीसुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर मानधन देण्याबाबतही या निवेदनात विशेष आग्रही मागणी करण्यात आली आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांना खेळाची ओढ लागल्यास भविष्यात शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, यांच्यासह प्रसाद कस्पटे, दिनेश काटे, राहुल खाडे, साची दोशी, राजेश डोंगरे, मनोज घोडेकर, अजय भोंडवे, जालिंदर काटे, मयूर काळभोर, गौरव शिरुडे, हेमंत देवकुळे, शरद भालेकर, आशिष राऊत, कृष्णा कदम, अभिजीत बागुल, अजय मोरे, सचिन उदागे, नितीन साळी, राजेश चौधरी, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, प्रदीप पवार, शंतनु चौधरी, साईराज भालेकर, ओंकार पवार, प्रतिक तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- kondhwa budruk kya hal banaa Rakha hai4
- पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर... मावळ पुणे :- पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या..... : लिंबराज कांबळे - ग्रामस्थ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास #DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य : डॉ.प्रविण दबडघाव विक्रम शिंदे /भोर दि.१४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प.महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडघाव यांनी केले.कापूरहोळ येथील विराट हिंदू मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. यावेळी मेळाव्याला कापूरहोळ, हरिश्चंद्री ,दिवळे ,केतकावळे, कुंभोशी ,चिव्हेवाडी, खडकी कामथडी , उंबरे या गावातून हिंदू राम भक्त उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी बालांनी रामरक्षा गणपती स्तोत्र मनाचे श्लोक सर्वांसमोर सादर केले जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी या गावाने ढोल लेझीमच्या वाद्य पथकाने नेत्रदीपक खेळ सादर करत लक्ष वेधून घेतले.1
- Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी1