महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना .शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित नांदेड दि. 30 एप्रिल : राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.०० हे आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण आणि तांत्रिक सुसूत्रता राखण्यासाठीजुन्या प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील भरपूर प्रमाणात अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व महाविद्यालयांनी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. सदरील पात्र अर्ज तात्काळ या कार्यालयाचे स्तरावर पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्तता होत नसतील व जे अर्ज अपात्र आहेत असे अर्ज आपल्या स्तरावरून रिजेक्ट करण्यात यावेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील प्रलंबित अर्ज मंगळवार ५ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निकाली काढावेत तसेच सन २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्ज रविवार १० मे २०२६ पर्यंत निकाली काढावेत. सदरील मुदत ही अंतिम असून यानंतर सदरील अर्जावर कार्यवाही होणार नाही, याची नोंद घायवी. तारखेनंतर एकही अर्ज प्रलंबित राहिल्यास व एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता1
- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती1
- Post by Mohsin ahmed khan1
- स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat1