Shuru
Apke Nagar Ki App…
गटार भरलेली असते त्याच्यामुळे लहान बाळ आजारी पडतात पण त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही
Samir sanjiv tadavi
गटार भरलेली असते त्याच्यामुळे लहान बाळ आजारी पडतात पण त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1
- औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव: शिस्त आणि भक्तीचा आदर्श संगम!2
- चिखली - किन्होळा येथील रहिवाशी आदरणीय श्री सचिन बबनराव बाहेकर (शिक्षक) —लाल बहादूर शास्त्री विद्यालय पारडगाव ज्ञानाची मशाल हातात घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजाळा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! 🔥📚 ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आलेला महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मा. दत्तात्रय वारे गुरुजी जि प शाळा जालिंदरनगर (जगातील पहिला क्रमांक मिळवणारी शाळा)यांच्या हस्ते स्वीकारण्याचा मान त्यांना लाभला — हा त्यांच्या कर्तृत्वाची, समर्पणाची आणि शिक्षणसेवेतील अखंड साधनेची एक उज्ज्वल पावतीच आहे. 🌟🏆 शिक्षक म्हणून त्यांनी केवळ धडे दिले नाहीत, तर संस्कारांची बीजे पेरत असंख्य जीवन घडवली — आणि याच कार्याचा हा अभिमानास्पद गौरव आहे. 🌹 त्यांची प्रेरणा अशीच नवनवीन शिखरे गाठत राहो, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!2
- धुळे महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेपूर्वीच आझाद हिंद संघटनेने जोरदार आंदोलन छेडले असून, मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनपाच्या सभागृहाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रफीक शाह पठाण यांनी शहरातील अनेक गंभीर प्रश्न मांडले.1