व्यंकटेश नगरात दिव्यांग महिलेला घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा.. व्यंकटेश नगरात दिव्यांग महिलेला घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा शेगाव : व्यंकटेश नगर परिसरात एका दिव्यांग महिलेला घरात घुसून लोटपाट करणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या मुलाचा आरोपींसोबत जगदंबा चौक परिसरात वाद झाला होता. या वादानंतर आरोपी फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी घरात येऊन ‘प्रशांत कुठे आहे?’ अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादीने घरात अचानक प्रवेश करण्याबाबत जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्यासोबत लोटपाट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी महिला दिव्यांग असून त्यांना एका पायाने चालता येत नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या परिस्थितीतही आरोपी क्रमांक 1 किशोर डाबेराव याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. दरम्यान, घटनेनंतर सुमारे दहा मिनिटांनी आरोपी क्रमांक 2 श्रीनीथ किशोर डाबेराव याने प्रशांतला घराबाहेर काढा, अन्यथा घरातील सर्वांना जीवे मारू, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच आरोपी क्रमांक 3 अक्षीत डाबेराव आणि आरोपी क्रमांक 4 रोशन बावणे यांनीही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घरात घुसून दिव्यांग महिलेसोबत गैरवर्तन व धमकी दिल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7.13 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 333, 296, 115(2), 351(2), 3(5) तसेच अपंग व्यक्ती अधिनियम 2016 मधील कलम 92(अ), 92(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेका सुनील सुसर करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील नेमके कारण आणि पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे.

- पुणे–नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर भीषण धडक; टिपर चालकाचा मृत्यू, ३ जण गंभीर तर १५ ते २० प्रवासी जखमी पुणे ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून, एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बस चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या रेतीच्या टिपरने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वाहतूक ठप्प अपघातानंतर पुणे–नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.1
- दर्यापूरच्या विविध मागण्यांसाठी ओम राणेंची मंत्रालयाकडे सायकलवारी निवेदनांना दाद न मिळाल्याने थेट मंत्रालय गाठण्याचा निर्णय; शिक्षण, शैक्षणिक इमारत आणि ट्रॉमा सेंटरसह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा1
- हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है। 24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया। मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है। अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है। 📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ। वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।1
- मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्... अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.1
- क्या ग्राम सभा गांव के विकास के लिए है या सिर्फ कागजों पर दिखावे के लिए? शिरपुर गांव वालों का गुस्से भरा सवाल! 📍 शिरपुर ग्राम पंचायत का चौंकाने वाला मामला! शिरपुर गांव में लगभग ५ साल बाद ग्रामसभा का आयोजन किया गया था। हालांकि, सुबह ११ बजे का समय तय होने के बावजूद दोपहर १२:३० बजे तक ग्रामसेवक उपस्थित नहीं हुए। सरपंच द्वारा लगातार ३ से ४ बार फोन करने के बाद भी ग्रामसेवक ने फोन नहीं उठाया। ग्रामीणों के तीखे सवाल: 👉 ५ साल बाद होने वाली ग्रामसभा के लिए ग्रामसेवक समय पर क्यों नहीं पहुंचे? 👉 सरपंच के बार-बार फोन करने के बावजूद फोन क्यों नहीं उठाया गया? 👉 ग्रामसभा समय पर शुरू न होने की जिम्मेदारी आखिर किसकी है? ग्रामसभा ग्रामीणों का बुनियादी अधिकार है और गांव के विकास का मुख्य मंच है। ग्रामीणों की मांग है कि संबंधित वरिष्ठ प्रशासन इस मामले को गंभीरता से संज्ञान में ले और उचित कार्रवाई करे।1
- इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.1
- नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.1
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1