धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न...! सुरेंद्र सोनवणे, लोणी प्रतिनिधी :– धामणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान मंदिरात श्रावण पौर्णिमेनिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, भंडाऱ्याची उधळण आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात श्री खंडोबा-बाणाईचा पारंपरिक शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण पौर्णिमेच्या पहाटे श्री खंडोबा मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत, नामदेव भगत, अनिरुद्ध वाळूंज यांच्यासह महिला भाविकांनी सप्तशिवलिंग तसेच श्री खंडोबा-बाणाईच्या पंचधातूच्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप लावून धार्मिक विधी पार पाडले. विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. खंडोबा-बाणाईच्या मुखवट्यांना आकर्षक वस्त्रालंकार, बाशिंग आणि मुंडावळ्या बांधून त्यांची विधिवत सजावट करण्यात आली. त्यानंतर वाद्यांच्या गजरात मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सहा वाजता ही मिरवणूक मंदिरात दाखल झाली. मंदिराच्या प्रांगणात महिलांनी नवरदेव खंडोबाच्या मुखवट्याचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर सनई, तुतारी आणि ढोलाच्या निनादात हिरवी साडी नेसवून अलंकारांनी सजवलेला बाणाईचा मुखवटा सेवेकरी मंडळींनी लग्नमंडपात आणला. यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली. खंडोबा-बाणाईच्या मुखवट्यांवर फुलांच्या पाकळ्या, अक्षता आणि भंडारा उधळण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक धार्मिक विधींच्या साक्षीने खंडोबा-बाणाईचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. विवाहानंतर उपस्थित भाविक व वऱ्हाडी मंडळींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे, पोपट भोजने, गणपत भोजने, गणेश जारकड आणि भाऊ भोजने यांनी केले. यावेळी सेवेकरी, मानकरी, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. दीपमाळ उभारणीच्या कामाला सुरुवात.....! श्री खंडोबा मंदिराच्या दोन्ही महाद्वारांच्या बाजूला भव्य दगडी दीपमाळ उभारण्याच्या कामाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. आगामी चंपाषष्ठी उत्सवापूर्वी दीपमाळेचे काम पूर्ण करण्याचा मानस ग्रामस्थ व सेवेकरी मंडळींनी व्यक्त केला. त्यामुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, भाविकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे.
धामणीत ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न...! सुरेंद्र सोनवणे, लोणी प्रतिनिधी :– धामणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान मंदिरात श्रावण पौर्णिमेनिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, भंडाऱ्याची उधळण आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात श्री खंडोबा-बाणाईचा पारंपरिक शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण पौर्णिमेच्या पहाटे श्री खंडोबा मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर
आरती करण्यात आली. सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत, नामदेव भगत, अनिरुद्ध वाळूंज यांच्यासह महिला भाविकांनी सप्तशिवलिंग तसेच श्री खंडोबा-बाणाईच्या पंचधातूच्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप लावून धार्मिक विधी पार पाडले. विवाह सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. खंडोबा-बाणाईच्या मुखवट्यांना आकर्षक वस्त्रालंकार, बाशिंग आणि मुंडावळ्या बांधून त्यांची विधिवत सजावट करण्यात आली. त्यानंतर वाद्यांच्या गजरात मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सहा वाजता ही मिरवणूक मंदिरात दाखल झाली. मंदिराच्या प्रांगणात महिलांनी नवरदेव
खंडोबाच्या मुखवट्याचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर सनई, तुतारी आणि ढोलाच्या निनादात हिरवी साडी नेसवून अलंकारांनी सजवलेला बाणाईचा मुखवटा सेवेकरी मंडळींनी लग्नमंडपात आणला. यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली. खंडोबा-बाणाईच्या मुखवट्यांवर फुलांच्या पाकळ्या, अक्षता आणि भंडारा उधळण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक धार्मिक विधींच्या साक्षीने खंडोबा-बाणाईचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. विवाहानंतर उपस्थित भाविक व वऱ्हाडी मंडळींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे, पोपट
भोजने, गणपत भोजने, गणेश जारकड आणि भाऊ भोजने यांनी केले. यावेळी सेवेकरी, मानकरी, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. दीपमाळ उभारणीच्या कामाला सुरुवात.....! श्री खंडोबा मंदिराच्या दोन्ही महाद्वारांच्या बाजूला भव्य दगडी दीपमाळ उभारण्याच्या कामाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. आगामी चंपाषष्ठी उत्सवापूर्वी दीपमाळेचे काम पूर्ण करण्याचा मानस ग्रामस्थ व सेवेकरी मंडळींनी व्यक्त केला. त्यामुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, भाविकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे.
- "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"1
- समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली1
- Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा1
- केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.1
- SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप1
- “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”1
- "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"1
- शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1