logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, निसर्गप्रेमी व अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या स्मरणार्थ 'पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर आडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व पर्यावरण मित्रांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की, मारुती चितमपल्ली यांनी आपल्या साहित्य आणि कार्यातून निसर्गसंवर्धनाचा जो अमूल्य संदेश दिला आहे, तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच, हरित, स्वच्छ आणि शाश्वत नाशिक घडविण्याच्या संकल्पासाठी अशा उपक्रमांना सदैव आपला पाठिंबा राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

4 hrs ago
user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
PRASIDDHI PRAMUKH NEWS
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago
071c42fa-252c-4d06-8cb6-62c71d667dc0

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, निसर्गप्रेमी व अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या स्मरणार्थ 'पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर आडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व पर्यावरण मित्रांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की, मारुती चितमपल्ली यांनी आपल्या साहित्य आणि कार्यातून निसर्गसंवर्धनाचा जो अमूल्य संदेश दिला आहे, तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच, हरित, स्वच्छ आणि शाश्वत नाशिक घडविण्याच्या संकल्पासाठी अशा उपक्रमांना सदैव आपला पाठिंबा राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
    3
    नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।
    1
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
    1
    नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले.

एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
    2
    संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
    user_Amol shelke 1711
    Amol shelke 1711
    Construction Worker संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.
    1
    येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे.

या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Farmer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    42 min ago
  • ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरण आणि धर्माच्या नावावर झालेल्या कथित लुटीच्या निषेधार्थ १२ जुलै २०२६ रोजी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन सादर करताना पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल शिनकर, एपीआय प्रशांत मोरे, हवालदार सोनार, हवालदार गीते आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या योग्य सहकार्याबद्दल अमित म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे आभार मानले. पोलिसांकडून हा अर्ज पुढील आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी "रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम" अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर रीतसर निवेदन सादर करून दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली।
    2
    ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरण आणि धर्माच्या नावावर झालेल्या कथित लुटीच्या निषेधार्थ १२ जुलै २०२६ रोजी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनादरम्यान डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन सादर करताना पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल शिनकर, एपीआय प्रशांत मोरे, हवालदार सोनार, हवालदार गीते आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या योग्य सहकार्याबद्दल अमित म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे आभार मानले. पोलिसांकडून हा अर्ज पुढील आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी "रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम" अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर रीतसर निवेदन सादर करून दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली।
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि परिसरात सलग २ दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः ज्या भागात आधीच पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. आता पुन्हा पाऊस पडेल का, असा मोठा प्रश्न आणि संभ्रम शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला असून अनेक ठिकाणी सध्या अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे. या संकटकाळात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास उपलब्ध पाण्याच्या मदतीने शेतात हलके सिंचन करावे. शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत किंवा मल्चिंगचा वापर करावा. तसेच, पुढील पावसाचा अंदाज पाहूनच खतांचा वापर करावा. जर पाऊस अधिक दिवस लांबला, तर शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा.
    1
    पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि परिसरात सलग २ दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः ज्या भागात आधीच पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. आता पुन्हा पाऊस पडेल का, असा मोठा प्रश्न आणि संभ्रम शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला असून अनेक ठिकाणी सध्या अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे.

या संकटकाळात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास उपलब्ध पाण्याच्या मदतीने शेतात हलके सिंचन करावे. शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत किंवा मल्चिंगचा वापर करावा. तसेच, पुढील पावसाचा अंदाज पाहूनच खतांचा वापर करावा. जर पाऊस अधिक दिवस लांबला, तर शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा.
    user_Rohit karpat
    Rohit karpat
    विक्रमगड, पालघर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नाशिकच्या सातपूर परिसरातील गाजलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तो दिघी येथील चोहोली फाटा परिसरात असल्याचे शोधून काढले व तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही घटना २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखले जाणारे फिर्यादी चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने वाहनात प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र राकेश सोनार तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
    3
    नाशिकच्या सातपूर परिसरातील गाजलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तो दिघी येथील चोहोली फाटा परिसरात असल्याचे शोधून काढले व तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही घटना २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखले जाणारे फिर्यादी चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने वाहनात प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र राकेश सोनार तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.