मुंबईमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली–गो अर्ली’ सुविधा जाहीर - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली–गो अर्ली” सुविधा लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून महिलांना सन्मान, समान संधी आणि सुरक्षितता मिळेल असा समाज निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.आंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.सुनेत्रा पवार म्हणाल्या की कम अर्ली–गो अर्ली या सुविधेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचारी सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन काम सुरू करू शकतील.त्यांनी जितक्या मिनिटे लवकर काम सुरू केले.तितक्याच मिनिटे त्यांना संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली जाईल. या सुविधेमुळे महिलांना जास्तीत जास्त ३० मिनिटांपर्यंत सवलत मिळू शकणार आहे.या निर्णयामुळे पीक अवरच्या काळात महिलांना प्रवास करताना भेडसावणाऱ्या अडचणी कमी होतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.विधान परिषदेत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानताना त्यांनी सांगितले की महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण सूचना समोर आल्या असून सरकार त्या सकारात्मक दृष्टीने विचारात घेऊन आवश्यक पावले उचलणार आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान १४ मोहिमा राबविण्यात आल्या असून त्यातून राज्यभरातील ४२,५९४ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेद्वारे ५,०६६ महिला आणि २,७७१ मुलांचा शोध लावण्यात आला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत असून महिलांशी संबंधित प्रकरणांच्या निवारणासाठी ५१ भरोसा सेल स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याचे सांगताना त्यांनी लाडकी बहिण, नमो महिला सशक्तीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा आणि लखपती दीदी या योजनांचा उल्लेख केला.स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आले असून ही उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.आंगणवाडी सेविका, सहायिकांच्या मानधन तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील १७,२५४ आंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरीवली रेल्वे स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिला सरकारी कर्मचाऱ्यांना १८० दिवसांच्या प्रसूती रजेची मंजुरी देण्यात आली असून त्यानंतर आवश्यक असल्यास महिलांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय कमाल एक वर्षापर्यंत अर्ध्या वेतनावर रजा घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात चौथी महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गावे निर्माण करणे आणि मुलींचे शिक्षण टिकविणे हा त्याचा उद्देश आहे.महिलांचे सक्षमीकरण केवळ आर्थिक पातळीवर मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक सक्षमीकरण तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.जिजाबाई,सावित्रीमाई फुले, अहिल्याबाई होळकर,महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या प्रगतीसाठी पुढे जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

- मुंबईतील टर्मिनल २ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी संजय कदम आणि तोष कदम यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times सोबत जोडलेले रहा.1
- लखीमपुर- मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस वालों की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा है अंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल⤵️1
- आंबेडकर की 135वीं जयंती के अवसर पर अंबेडकर चैत्य भूमि से @indiaaajkaltv का सीधा प्रसारण। Special live coverage from chaityabhumi of @indiaaajkaltv of 135th birth anniversary of Dr. BR Ambedkar डॉ. बी.आर. आंबेडकर की 135वीं जयंती पर चैत्यभूमि से @indiaaajkaltv की विशेष लाइव कवरेज।1
- गोरेगाव येथील नेस्को परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विद्यार्थ्यांनी कॅबमध्येच ड्रग्सचे सेवन करणे, एमडीसारख्या घातक पदार्थांचा वापर करणे आणि त्यातून ओव्हरडोस होऊन प्रकृती बिघडणे.ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक व धक्कादायक आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. ॲड. अमोल मातेले म्हणाले “मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज इतक्या सहजपणे पोहोचत असतील, तर हे सरकारचे पूर्ण अपयश आहे. कल्याण परिसरातून ड्रग्ज मागवले जातात, इव्हेंटमध्ये खुलेआम सेवन केले जाते, आणि प्रशासनाला काहीच सुगावा लागत नाही.हे अत्यंत लाजिरवाणे आहे.हे फक्त काही विद्यार्थ्यांचे प्रकरण नाही, तर यामागे मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅकेटला कोणाचे संरक्षण आहे? कोणत्या राजकीय दबावाखाली हे प्रकार सुरू आहेत? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे! पोलीस फक्त अटक दाखवून जबाबदारी संपली असे समजत असतील, तर ते चुकीचे आहे. 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग, पुरवठादारांची साखळी हे सर्व पाहता ही केवळ हिमनगाची टोक आहे.” “राज्य सरकारने तात्काळ विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उध्वस्त करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. महाराष्ट्रातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ!” ड्रग्ज पुरवठा साखळीचा संपूर्ण भांडाफोड करावा.संबंधित पोलीस व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीशैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज मोहिम तातडीने राबवावी“महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आणि त्यात अपयश आल्यास जनता माफ करणार नाही!”1
- Today Special Video From Mi Marathi India1
- 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews1
- Post by Nirbhay Nagri1
- लखीमपुर जिले के मैलानी इलाके में बाबा साहेब की मूर्ति लगाने को लेकर बवाल दलित समाज के गौतम और भार्गव समाज के लोगों में हुई भिड़ंत , विवादित ज़मीन पर गौतम समाज बाबा साहेब अंबेडकर की मूर्ति स्थापित करने जा रहा था , भार्गव समाज ने विरोध किया , बवाल हुआ,पुलिस से भी भिड़े प्रदर्शनकारी,कुछ लोग घायल हैं !! लखनऊ से लगातार दिशा निर्देश के बाद अतिसंवेदनशील दिवस पर पुलिस - प्रशासन क्या कर रहा था यह SIT ही बता पायेगी !! _»› मैलानी-बांकेगंज में बवाल, 20 पुलिसकर्मी घायल हुए है__ मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में B. R. Ambedkar की मूर्ति तोड़े जाने के बाद हिंसा भड़क गई। पथराव में करीब 20 पुलिसकर्मी घायल हुए हैं, जबकि थाना, चौकी और एडिशनल एसपी की गाड़ियां क्षतिग्रस्त की गईं। घटना के दौरान Dainik Bhaskar का एक रिपोर्टर भी हल्का घायल हुआ। इलाके में भारी पुलिस बल तैनात है और हालात तनावपूर्ण बने हुए हैं। जिला मुख्यालय से भारी पुलिस बल मौके की ओर रवाना किया गया है । मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा हैअंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल प्रशासन की गाड़ियों पर पथराव एडिशनल SP मौके पर।1