परंड्यात चार दिवसांपासून पाणीपुखठा ठप्प जनशक्ती नगर विकास आघाडी आक्रमक परंड्यात चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; जनशक्ती नगर विकास आघाडी आक्रमक 📰 सविस्तर बातमी परंडा : शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पंप बिघाडाची माहिती नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना देऊनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असा आरोप जनशक्ती नगर विकास आघाडीने केला आहे. या निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळत नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच वेळ पडल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

- Post by Vijay Meher1
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by AapTak Hindi News Channel1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- निलंग्यात छावा संघटना आक्रमक; जिओ कंपनीचा मनमानी कारभार आणि नाटक खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा देत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास (भैया) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिओ कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडण्यात आले. नमस्कार छावा महाराष्ट्राचा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे निलंगा येथील जिओ ऑफिस ची नेमकी घटना काय? गेल्या काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील जिओ ग्राहकांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनीच्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा असंतोष होता. या पार्श्वभूमीवर, छावा संघटनेने आज थेट कृती करत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. 'नाटकं चालणार नाहीत' - दास साळुंके या आंदोलनावेळी बोलताना दास साळुंके म्हणाले की, कंपनी केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत असून प्रत्यक्ष सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. "निलंग्याच्या मातीत ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासकीय नाटकं अजिबात सहन केली जाणार नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले.1
- Post by Vijay Meher1