अंबाजोगाई : नगरपरिषद कार्यालयाच्या समोरच फोर व्हीलरचा सुळसुळाट नागरिकांना नाहक त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालय हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. मात्र नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच आणि रस्त्यावरच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या चार चाकी गाड्या बेकायदेशीरपणे लावल्या जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. नगरपरिषदेच्या आवारात ड्रायव्हिंग स्कूलच्या आणि इतर खाजगी चार चाकी गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांना, रुग्णांना आणि शाळकरी मुलांना जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. सदरील परिसरात द ज्यूस फार्म, रॉयल केक्स अशा दुकानासमोरच गाड्या लावल्याने व्यापाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे. हा रस्ता बस स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. असे असतानाही नगरपरिषद प्रशासन आणि वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नगरपरिषदेने तात्काळ या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. #Ambajogai #BeedNews #NagarParishad #TrafficIssue #BeedNewsExpress
अंबाजोगाई : नगरपरिषद कार्यालयाच्या समोरच फोर व्हीलरचा सुळसुळाट नागरिकांना नाहक त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालय हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. मात्र नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच आणि रस्त्यावरच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या चार चाकी गाड्या बेकायदेशीरपणे लावल्या जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. नगरपरिषदेच्या आवारात ड्रायव्हिंग स्कूलच्या आणि इतर खाजगी चार चाकी गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांना, रुग्णांना आणि शाळकरी मुलांना जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. सदरील परिसरात द ज्यूस फार्म, रॉयल केक्स अशा दुकानासमोरच गाड्या लावल्याने व्यापाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे. हा रस्ता बस स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. असे असतानाही नगरपरिषद प्रशासन आणि वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नगरपरिषदेने तात्काळ या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. #Ambajogai #BeedNews #NagarParishad #TrafficIssue #BeedNewsExpress
- प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी1
- 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes1
- 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी1
- ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस1
- जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.1
- संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..1
- 🚨 Nanded Crime | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा छापा; ₹६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त 📍नायगाव | २७ ऑगस्ट २०२६ नायगाव परिसरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ₹६,०१,७९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वडजे हॉस्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार तपासली असता विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी, संजय शंकर बानेवाड आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ६५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 💰 दारू : ₹१,०१,७९० 🚗 कार : ₹५ लाख 📦 एकूण मुद्देमाल : ₹६,०१,७९० या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NandedCrime #Naigaon #NandedPolice #PoliceAction #MaharashtraNews #NandedUpdates #NandigramTimes #nandedfirstnews #shaikhjahurdudhadkar #NandedUpdates #nanded1
- जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चा उत्साह जालन्यात शिगेला पोहोचला आहे. चौधरी नगर परिसरातील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौधरी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. भव्य मंडप उभारण्यात आला असून, कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट व इतर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बंजारा समाजातील महिला, तरुणी, पुरुष, नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहाने एकत्र येत पारंपरिक कार्यक्रमांचा सराव करत आहेत. ढोलाच्या तालावर आणि पारंपरिक बंजारा लोकगीतांच्या सुरांवर महिला व तरुणी वर्तुळाकार रिंगणात फेर धरून नृत्याचा सराव करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि नृत्यामुळे चौधरी नगर परिसरात सध्या बंजारा संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, दोन दिवसांच्या कालावधीत बंजारा समाजाच्या परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये पारंपरिक बंजारा लोकनृत्य, तीज गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.1
- ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर1