logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विधानसभेत आ. श्रीजया चव्हाण भावूक महिलांसाठी समान संधींची ठाम मागणी. नांदेड l भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण आज आपल्या राजकीय प्रवासाबद्दल विधानसभेत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. मी पहिल्यांदाच निवडून आलेली आमदार आहे. मला भाऊ नाही, पण अभिमानाने सांगते की, माझ्या नांदेड जिल्ह्यातील आणि भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी मला भावासारखी साथ दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी लोकांचे प्रश्न मांडू शकत आहे, अशा भावनांनी ओथंबलेल्या शब्दांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी महिलांसाठी शासकीय योजना व उपाययोजना या विषयावर प्रस्ताव मांडला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आ. श्रीजया चव्हाण यांनी महिलांशी निगडित अनेक विषयांवर मते मांडली. आम्ही जिजाऊ, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीआई आणि रमाईच्या लेकी आहोत. कुटुंबासाठी आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही सवलत नको, तर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समान संधी हवी, या शब्दांत त्यांनी स्त्री-शक्तीचा जागर केला. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. मात्र, पासष्टी ओलांडलेल्या अनेक महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे सरकारने या वयोमर्यादेचा फेरविचार करून ती ७५ वर्षांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. इडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. महिला दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा किंवा सन्मान करण्याचा वर्षातला एकच दिवस नसावा. स्त्रीचा सन्मान हा संस्कार असून तो वर्षाचे ३६५ दिवस जपला गेला पाहिजे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न महिलांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

on 11 March
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
on 11 March
f8a88761-06d7-4e73-82cf-6ec5785dfbbf

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    1
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष!
हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
#DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    user_सारथी महाराष्ट्र न्यूज
    सारथी महाराष्ट्र न्यूज
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    5
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
“परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन
    1
    मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.