एक महीन्यांपासुन विश्वासघात व फसवणुक करुन ट्रॅक्टर घेवुन फरार झालेल्या आरोपीकडुन ९ लाख रुपये किंमतीचे सोनालीका ट्रॅक्टर जप्त चंदनझिरा पोलीसांची कामगीरी एक महीन्यांपासुन विश्वासघात व फसवणुक करुन ट्रॅक्टर घेवुन फरार झालेल्या आरोपीकडुन ९ लाख रुपये किंमतीचे सोनालीका ट्रॅक्टर जप्त चंदनझिरा पोलीसांची कामगीरी सोनालीका ट्रॅक्टर शोरुम जालना येथुन एका दिवसाकरीता डेमो घेण्यासाठी घेवुन गेलेले ट्रॅक्टर विश्वासघात व फसवणुक करुन फरार झालेल्या कलीम बेग सलीम बेग मिर्झा रा. कस्तुरवाडी ता. बदनापुर जि. जालना यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ९ लाख रुपये किंमतीचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले आहे. त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंदनझिरा परीसरामध्ये सोनालका ट्रॅक्टरचे शोरुम आहे. सदर शोरुम मध्ये तक्रारदार अर्जुन रमेश लोखंडे हे मालक आहेत. मागील एक महीन्यापुर्वी दिनांक १३/०३/२०२६ रोजी आरोपी नामे कलीम बेग सलीम बेग मिर्झा रा. कस्तुरवाडी ता. बदनापुर जि. जालना हा शोरुम वर आला व त्याने ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे असे सांगुन शोरुम मधुन एक दिवसाचा ट्रायल डेमो घेण्यासाठी एक नवे कोरे ट्रॅक्टर एक दिवसाकरीता घेवुन गेला होता. त्याबाबत त्याने शोरुम मध्ये करार करुन दिला होता. आरोपीने करार करुन दिल्याने शोरुमचे मालक यांनी त्याचेवर विश्वास ठेवुन त्यास एक दिवसाच्या ट्रायलसाठी ट्रॅक्टर दिले होते. आरोपी ट्रॅक्टर घेवुन गेल्याचे नंतर एक दिवसाची मुदत संपल्यावर देखील तो ट्रॅक्टर परत घेवुन आला नाही. ट्रॅक्टर परत न आल्याने तक्ररदार शोरुम मालक यांनी आरोपी कलीम बेग सलीम बेग मिर्झा रा. कस्तुरवाडी ता. बदनापुर जि. जालना यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही तसेच त्याचा शोध घेवुन देखील तो किंवा ट्रॅक्टर मिळून आले नाही. आपला विश्वासघात होवुन फसवणुक झाल्याचे तक्रारदार यांचे लक्षात येताच त्यांनी दोन दिवसांपुर्वी पोलीस ठाणे चंदनझिरा गाठुन आरोपी विरुध्द तक्रार दिली होती. एक दिवसाकरीता ट्रॅक्टर घेवुन जावुन परत न करणे ही अंत्यत गंभीर बाब असल्याने पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपास अधिकारी रवी देशमाने यांना आरोपीचा शोध घेवुन त्याचे कडुन ट्रॅक्टर जप्त करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यावरुन पोउपनि देशमाने यांनी व त्यांचे पथकाने फरार आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली पण त्याला पोलीस खाक्या दाखवीताच त्याने ट्रॅक्टर घेवुन गेला असल्याचे सांगीतले व लपवुन ठेवलेले ट्रॅक्टर हजर केले ते पोलीसांनी जप्त केले आहे. सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनझिराचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, मारीयो स्कॉट, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप उगले, पोलीस अंमलदार गणेश नाईकवाडे यांच्या पथकाने केली आहे.

- सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला1
- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे1
- *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय1
- वडाळी हादरली! पोलिसांत तक्रार होऊनही चोर पुन्हा त्याच ठिकाणी परतले; ४ लाखांचे सोने लंपास.1
- मराठवाड्यात पुढील ३ दिवस वादळी पावसाचा इशारा 🌩️ मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्वाचे मुद्दे: 30–40 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना काही भागात जोरदार सरींची शक्यता तापमानात किंचित घट होणार कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सूचना: वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नका विजांच्या वेळी मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा शेतकऱ्यांनी पिकांची आणि साठवलेल्या मालाची योग्य काळजी घ्यावी हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1