logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कागदी योजनांपेक्षा शाळांमध्ये प्रत्यक्ष समुपदेशकांची नियुक्ती आणि कठोर अमलबजावणी करा – खासदार प्रतिभा धानोरकर विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येवर खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक; केंद्राच्या अपुऱ्या धोरणांवर तीव्र संताप चंद्रपूर : देशातील शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक कोचिंग संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि स्पर्धा परीक्षांचा ताण दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारख्या अत्यंत दुर्दैवी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. केंद्र सरकारकडून 'मनोदर्पण', 'टेली-मानस' किंवा कागदोपत्री धोरणांची कितीही घोषणा केली जात असली, तरी प्रत्यक्षात या उपायांचा कोणताही ठोस उपयोग होत नसून घटनांचे प्रमाण वेगाने वाढतच आहे, अशी टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. लोकसभेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्या आणि मानसिक ताणतणावाबाबत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला (क्र. २२८६) उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये सीबीएसईच्या नियमांनुसार शाळांमध्ये दुहेरी समुपदेशक नियुक्ती, हेल्पलाइन कॉल्स आणि विविध कार्यक्रमांचा उल्लेख केंद्राने केला आहे. परंतु, या सर्व योजना केवळ कागदावर आणि आकडेवारीपुरत्याच मर्यादित राहिल्याचे चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे. या विषयावर तीव्र विरोध आणि चिंता व्यक्त करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "केंद्राने दिलेली आकडेवारी आणि दावे प्रत्यक्षातील परिस्थितीशी जुळणारे नाहीत. कोचिंग हब आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आजही विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक दबाव आहे, मात्र तिथे ना योग्य मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत, ना समुपदेशक. केंद्र सरकार केवळ हेल्पलाइन कॉल्सची संख्या दाखवून आपली जबाबदारी झाकत आहे, तर दुसरीकडे निष्पाप विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे." खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढे मागणी केली की, केंद्र सरकारने आणि शिक्षण मंत्रालयाने केवळ कागदी परिपत्रके न काढता देशातील प्रत्येक शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'सामाजिक-भावनात्मक समुपदेशक' व 'करिअर समुपदेशक' यांची प्रत्यक्ष नियुक्ती झाली आहे की नाही, याची कठोर तपासणी करावी. तसेच, नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी तातडीने स्वतंत्र व प्रभावी राष्ट्रीय धोरण राबवून अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

17 hrs ago
user_Disha News
Disha News
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
17 hrs ago
d572789b-11e2-4991-8acd-2a50a822a8b7

कागदी योजनांपेक्षा शाळांमध्ये प्रत्यक्ष समुपदेशकांची नियुक्ती आणि कठोर अमलबजावणी करा – खासदार प्रतिभा धानोरकर विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येवर खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक; केंद्राच्या अपुऱ्या धोरणांवर तीव्र संताप चंद्रपूर : देशातील शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक कोचिंग संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि स्पर्धा परीक्षांचा ताण दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारख्या अत्यंत दुर्दैवी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. केंद्र सरकारकडून 'मनोदर्पण', 'टेली-मानस' किंवा कागदोपत्री धोरणांची कितीही घोषणा केली जात असली, तरी प्रत्यक्षात या उपायांचा कोणताही ठोस उपयोग होत नसून घटनांचे प्रमाण वेगाने वाढतच आहे, अशी टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. लोकसभेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्या आणि मानसिक ताणतणावाबाबत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला (क्र. २२८६) उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये सीबीएसईच्या नियमांनुसार शाळांमध्ये दुहेरी समुपदेशक नियुक्ती, हेल्पलाइन कॉल्स आणि विविध कार्यक्रमांचा उल्लेख केंद्राने केला आहे. परंतु, या सर्व योजना केवळ कागदावर आणि आकडेवारीपुरत्याच मर्यादित राहिल्याचे चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे. या विषयावर तीव्र विरोध आणि चिंता व्यक्त करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "केंद्राने दिलेली आकडेवारी आणि दावे प्रत्यक्षातील परिस्थितीशी जुळणारे नाहीत. कोचिंग हब आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आजही विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक दबाव आहे, मात्र तिथे ना योग्य मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत, ना समुपदेशक. केंद्र सरकार केवळ हेल्पलाइन कॉल्सची संख्या दाखवून आपली जबाबदारी झाकत आहे, तर दुसरीकडे निष्पाप विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे." खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढे मागणी केली की, केंद्र सरकारने आणि शिक्षण मंत्रालयाने केवळ कागदी परिपत्रके न काढता देशातील प्रत्येक शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'सामाजिक-भावनात्मक समुपदेशक' व 'करिअर समुपदेशक' यांची प्रत्यक्ष नियुक्ती झाली आहे की नाही, याची कठोर तपासणी करावी. तसेच, नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी तातडीने स्वतंत्र व प्रभावी राष्ट्रीय धोरण राबवून अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
    1
    ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू
वर्धा. हिंगणघाट
: वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan
    2
    क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡
🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 

🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान  

✨ Heart Diseases
✨ Diabetes 
✨ Kidney Diseases
✨ Liver Diseases
✨ Lung(Asthma & TB)

📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से  
📞 Appointment Book करें: +91 9125734374
#DrMeherAbbas
#LiverFunctionTest
#LiverHealth
#FattyLiver&NAFLD
#Fibrousscan




@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    20 hrs ago
  • देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
    1
    देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी 
आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले.
या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मुसळधार पावसाने पिपरीचा संपर्क तुटला; नाल्याला पूर आल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ तासन्‌तास अडकले वर्धा ..हिंगणघाट काल दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या गिरड–कोरा मार्गावरील पिपरी बसस्थानकाजवळील दोन नाल्यांना पूर आला. पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने पिपरी गावाकडे जाणारा मुख्य मार्ग अनेक तास बंद राहिला. परिणामी शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना तासन्‌तास थांबावे लागले, तर काहींना शेजारच्या गावात मुक्काम करण्याची वेळ आली. पिपरी गावासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यावरील पूर तीन ते चार तास कायम राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. विशेषतः शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, तर ग्रामस्थांनाही दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उंच पुलाची उभारणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने पूल उभारणीस मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.
    1
    मुसळधार पावसाने पिपरीचा संपर्क तुटला; नाल्याला पूर आल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ तासन्‌तास अडकले
वर्धा ..हिंगणघाट
काल दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या गिरड–कोरा मार्गावरील पिपरी बसस्थानकाजवळील दोन नाल्यांना पूर आला. पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने पिपरी गावाकडे जाणारा मुख्य मार्ग अनेक तास बंद राहिला. परिणामी शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना तासन्‌तास थांबावे लागले, तर काहींना शेजारच्या गावात मुक्काम करण्याची वेळ आली.
पिपरी गावासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यावरील पूर तीन ते चार तास कायम राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. विशेषतः शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, तर ग्रामस्थांनाही दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उंच पुलाची उभारणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने पूल उभारणीस मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • वाडा बिअर बार मध्ये जुगार खेळतां ना सात आरोपीवर कारवाई , शहरात एकच खळबळ ८ कक्ष ५६ हजार ५० हजारचा मुद्देमाल जप्त उमरेड । भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २ किमी अंतरावर असलेल्या भिवापूर - उमरेड महामार्गवर असलेला वाडा बार मधील एका खोलीत जुगार खेळत असतांना ७ जणांवर कारवाई करीत ८ लक्ष ५६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. सदरच्या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. दि. ३० जुलै सायंकाळच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर वाडा बार येथे एका बंदिस्त जागेत सात व्यक्ति पैशाची बाजी लावून हारजीत जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय किशोर सिंग ठाकूर यांनी केली आहे.सदरच्या कारवाई मध्ये आरोपीकडून ४४ ६०० रूपये नगदी, मोबाईल हन्डसेट ९ नग २,६५, ००० रुपये , दुचाकी वाहने १,४५, ००० रुपये, चारचाकी वाहन ४,००, ००० रुपये असा सर्व मिळून एकूण ८, ५६, ०५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    1
    वाडा बिअर बार मध्ये जुगार खेळतां ना सात आरोपीवर कारवाई , शहरात एकच खळबळ
८ कक्ष ५६ हजार ५० हजारचा मुद्देमाल जप्त
उमरेड । भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर पासून २ किमी अंतरावर असलेल्या
भिवापूर - उमरेड महामार्गवर असलेला वाडा बार मधील एका खोलीत जुगार खेळत असतांना ७ जणांवर कारवाई करीत ८ लक्ष ५६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. सदरच्या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. दि. ३० जुलै सायंकाळच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर वाडा बार येथे एका बंदिस्त जागेत सात व्यक्ति पैशाची बाजी लावून हारजीत
जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय किशोर सिंग ठाकूर यांनी केली आहे.सदरच्या कारवाई मध्ये आरोपीकडून ४४ ६०० रूपये नगदी, मोबाईल हन्डसेट ९ नग २,६५, ००० रुपये , दुचाकी वाहने १,४५, ००० रुपये, चारचाकी वाहन ४,००, ००० रुपये असा सर्व मिळून एकूण ८, ५६, ०५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.