साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवनाथ शिराळे पाटील यांचे अभिवादन; तरुणांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपावा, राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवनाथ शिराळे पाटील यांचे अभिवादन; तरुणांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपावा, राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर राहोत'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; सामाजिक समता, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश बीड | प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अभिवादनपर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, बीड नगर परिषदेचे माजी सभापती तथा महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवनाथजी (अण्णा) शिराळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर राहोत' या घोषणांनी परिसर दुमदुमला. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचे स्मरण करत त्यांना सामूहिक अभिवादन केले. नवनाथजी (अण्णा) शिराळे पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने आणि विशेषतः तरुणांनी अंगीकारावा, असे सांगितले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नवनाथ शिराळे पाटील म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार, श्रमिकांचे कैवारी आणि वंचित-शोषित समाजाचे समर्थ आवाज होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून सामाजिक समता, मानवी मूल्ये, अन्यायाविरोधातील संघर्ष आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांच्या साहित्याने लाखो लोकांच्या मनात परिवर्तनाची ज्योत पेटवली असून आजही त्यांचे विचार तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. ते पुढे म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे वाचन करून त्यांचे आचरण जीवनात उतरविणे आवश्यक आहे. समाजहित, राष्ट्रहित आणि मानवतेची सेवा हीच खरी जीवनाची दिशा आहे. तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा यांना प्राधान्य द्यावे. समाजात समता, बंधुता आणि एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे हीच अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली ठरेल. यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या साहित्यामुळे समाजातील वंचित, कष्टकरी आणि श्रमिक वर्गाला आत्मविश्वास व नवी दिशा मिळाली. आजही त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेले विचार समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास 'लेक लाडकी' अभियानाचे बाजीराव ढाकणे, रयत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक आर. जी. माने, सामाजिक कार्यकर्त्या तथा महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या मीराताई डावकर, ॲड. वंदना पारवे, पत्रकार किशोर देवा कुलकर्णी (कुक्कडगावकर), दैनिक न्याय टाइम्सचे पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी (कुक्कडगावकर) यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माता-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या समतावादी, पुरोगामी आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक न्यायाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!1
- जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.1
- लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.4