पूनमताई तोडकर यांची नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; महिला, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या विचारांशी जोडलेले नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पूनमताई तोडकर यांनी सांगितले. महिला सक्षमीकरण आणि युवकांना संधी महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देऊन महिलांना सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेण्यात येणार आहे. युवकांना संघटनेशी जोडताना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक समस्या आणि जनहिताचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्यावरही भर राहणार आहे. याशिवाय रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, महिला व युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संघटनेचे कार्य केवळ राजकीय चौकटीपुरते मर्यादित न ठेवता समाजसेवा आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा मानस पूनमताई तोडकर यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत संघटनेची आगामी दिशा आणि कृती आराखडा निश्चित केला जाणार असून, जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे. “पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विचार मंचाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहणे, महिला आणि युवकांना नेतृत्वाची संधी देणे आणि जनसेवेला प्राधान्य देणे, हा आमचा प्रमुख संकल्प आहे,” असे पूनमताई तोडकर यांनी सांगितले. या निवडीबद्दल मंचाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूनमताई तोडकर यांचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .4
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटे माळ येथे निसर्गरम्य स्वच्छ हवेत संपूर्ण प्रकल्पाला वृक्षारोपण असलेला एकमेव 24 एम्पायर होम्स अँड प्रॉपर्टीज श्रीनाथ पार्क चे भव्य उद्घाटन 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्ता वर संपन्न झाला याप्रसंगी रामदास इथापे अभिजीत घोरपडे बबन शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची सागर गालींदे भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर संतोष ठोंबरे योगेश शेळके पाटील नंदकुमार खताळ सुरेश चव्हाण सत्यजित खताळ आप्पा शेळके पाटील प्रवीण खताळ राहुल आगाम रवींद्र माने अण्णा जेधे एडवोकेट गजेंद्र मुसळे आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!1