*स्वप्नपूर्तीचा सोहळा! चांदवडमध्ये NDST सोसायटीच्या नूतन वास्तूचे दिमाखात लोकार्पण; खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते उदघाटन* शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड: "संस्थेची स्वमालकीची वास्तू ही केवळ वीट-मातीची इमारत नसून, ती हजारो शिक्षक सभासदांच्या विश्वासाचे आणि कष्टाचे प्रतीक आहे," अशा शब्दांत ज्ञानेश्वर ठाकरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. निमित्त होते, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक निवृत्तीवेतन (NDST) सोसायटीच्या चांदवड शाखेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे. दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांच्या शुभहस्ते या वास्तूचे लोकार्पण अत्यंत उत्साहात संपन्न झाले. शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने हा सोहळा उजळून निघाला होता. यामध्ये प्रामुख्याने आमदार किशोरभाऊ दराडे (शिक्षक आमदार), सुधीर तांबे (माजी आमदार), शिरीषभाऊ कोतवाल (माजी आमदार),मविप्र सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे, संचालक संदीपभाऊ गुळवे, सयाजीराव गायकवाड, चांदवड नगराध्यक्ष बागुल, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी. शिवाजीराजे निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, रविंद्र मोरे, गोरख तात्या सोनवणे, संजय चव्हाण (शिक्षक सेना) हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर ठाकरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "आज या नूतन वास्तूच्या रूपाने सभासदांच्या हक्काचे घर साकारले आहे. पारदर्शक कारभार आणि सभासद केंद्रबिंदू मानून केलेल्या कामाचे हे फळ आहे. ही वास्तू भविष्यात शिक्षकांच्या विविध प्रश्ना सोडवण्यासाठी एक ऊर्जेचे केंद्र ठरेल. त्यांच्या या मांडणीने उपस्थितांच्या मनात संस्थेबद्दलचा अभिमान अधिकच वृद्धिंगत झाला. संस्थेच्या अध्यक्षा विजया पाटील, कार्यवाह प्राचार्य अशोक बागुल, उपाध्यक्ष प्राचार्य विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत देखण्या पद्धतीने पार पडला. माजी चेअरमन संजय देवरे, रामराव बनकर, किशोर जाधव, जिभाऊ शिंदे आणि सर्व विद्यमान व माजी संचालक मंडळाने या वास्तू स्वप्नपूर्तीसाठी विशेष मेहनत घेतली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील असंख्य शिक्षक बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप करताना माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अरुण पवार यांनी सर्व मान्यवर आणि सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले. चांदवडच्या शैक्षणिक वैभवात भर घालणारा हा सोहळा सभासदांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, यात शंका नाही.
*स्वप्नपूर्तीचा सोहळा! चांदवडमध्ये NDST सोसायटीच्या नूतन वास्तूचे दिमाखात लोकार्पण; खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते उदघाटन* शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड: "संस्थेची स्वमालकीची वास्तू ही केवळ वीट-मातीची इमारत नसून, ती हजारो शिक्षक सभासदांच्या विश्वासाचे आणि कष्टाचे प्रतीक आहे," अशा शब्दांत ज्ञानेश्वर ठाकरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. निमित्त होते, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक निवृत्तीवेतन (NDST) सोसायटीच्या चांदवड शाखेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे. दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांच्या शुभहस्ते या वास्तूचे
लोकार्पण अत्यंत उत्साहात संपन्न झाले. शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने हा सोहळा उजळून निघाला होता. यामध्ये प्रामुख्याने आमदार किशोरभाऊ दराडे (शिक्षक आमदार), सुधीर तांबे (माजी आमदार), शिरीषभाऊ कोतवाल (माजी आमदार),मविप्र सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे, संचालक संदीपभाऊ गुळवे, सयाजीराव गायकवाड, चांदवड नगराध्यक्ष बागुल, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी. शिवाजीराजे निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, रविंद्र मोरे, गोरख तात्या सोनवणे, संजय चव्हाण (शिक्षक सेना) हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर ठाकरे यांनी आपल्या ओघवत्या
शैलीत संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "आज या नूतन वास्तूच्या रूपाने सभासदांच्या हक्काचे घर साकारले आहे. पारदर्शक कारभार आणि सभासद केंद्रबिंदू मानून केलेल्या कामाचे हे फळ आहे. ही वास्तू भविष्यात शिक्षकांच्या विविध प्रश्ना सोडवण्यासाठी एक ऊर्जेचे केंद्र ठरेल. त्यांच्या या मांडणीने उपस्थितांच्या मनात संस्थेबद्दलचा अभिमान अधिकच वृद्धिंगत झाला. संस्थेच्या अध्यक्षा विजया पाटील, कार्यवाह प्राचार्य अशोक बागुल, उपाध्यक्ष प्राचार्य विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत देखण्या पद्धतीने पार पडला. माजी चेअरमन
संजय देवरे, रामराव बनकर, किशोर जाधव, जिभाऊ शिंदे आणि सर्व विद्यमान व माजी संचालक मंडळाने या वास्तू स्वप्नपूर्तीसाठी विशेष मेहनत घेतली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील असंख्य शिक्षक बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप करताना माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अरुण पवार यांनी सर्व मान्यवर आणि सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले. चांदवडच्या शैक्षणिक वैभवात भर घालणारा हा सोहळा सभासदांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, यात शंका नाही.
- *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;* चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.4
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...1
- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- Post by Afsjcjryued1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- सीएम नीतीश कुमार के इस्तीफ़ा देने के बाद फूट-फूट कर रोने लगे मंत्री अशोक चौधरी !!1