पाचोरा येथील स्व. अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचे १५ दिवसीय प्रवास कलेचा प्रदर्शनाचा समारोप पाचोरा येथील स्व. अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचे १५ दिवसीय प्रवास कलेचा प्रदर्शनाचा समारोप; प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना मिळाले मार्गदर्शन पाचोरा: पु.ना. गाडगीळ जळगाव येथे स्व.अनिल दादा देशमुख कला महाविद्यालय पाचोरा आयोजित 'प्रवास कलेचा' या चित्रप्रदर्शनाचा समारोप १५ फेब्रुवारी रोजी उत्साहात झाला. हे प्रदर्शन १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या १५ दिवसांच्या काळात प्रदर्शनाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक नवीन आणि उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून पाचोरा कला महाविद्यालय आणि ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा येथील स्व. अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्गचित्राचे (Landscape) जिवंत प्रात्यक्षिक करून दाखविले. निसर्गचित्र रेखाटताना जागेची निवड कशी करावी, चित्रातील कोणत्या भागाला कमी-जास्त महत्त्व द्यावे आणि जलरंग हाताळण्याची अचूक पद्धत कोणती, याचे सखोल मार्गदर्शन त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे केले. तसेच, जामनेर येथील चित्रकार निलेश कुंवर यांनी विद्यार्थ्यांना पेन्सिल स्केच, पोर्ट्रेट आणि 'फिगर ड्रॉईंग'चे बारकावे समजावून सांगितले. त्यांनी प्रत्यक्ष मॉडेल समोर बसवून रेखाटन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ललित कला महाविद्यालयाच्या प्रा. वंदना परमार यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कलाशिक्षक सागर मोरे, प्राचार्य मुजम्मील शेख, वाल्मीक पाटील, अनिल वंजारी, ईश्वर सपकाळे, हेमांगी बोबडे, आणि पूजा पाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नेहा पाटील, रोशनी पाटील, साक्षी पाटील, भूमी पाटील, दिशा ठाकूर, श्रद्धा बडगुजर, मिनाक्षी इंगळे, शाहबाज खान, शिफा खान, सरला सोनवणे, संदिप बिराडे, स्वाती महाजन यांसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नेहा पाटील यांनी मानले.

- Post by SamirQureash Quresh1
- शुरु न्युज चॅनल आपली प्रतिक्रिया देताना भगतसिंग राजपुत1
- आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे1
- शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान1
- मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.1
- चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- आज दिनांक 18 फेब्रुवारी रात्री सात वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी अजिंठा घाटात एका वाहनाचा अपघात झाला यानंतर दोन्ही बाजूने मोठी ट्राफिक जाम झाली आहे सदरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्यतीचे प्रयत्न करीत आहे1