संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेडची विद्यार्थिनी कु. स्वरांजली पवार ने ललितबंध "आशाओं का मिराज" द्वारे साहित्य निर्मितीत टाकले पहिले पाऊल उमरखेड : संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु.स्वरांजली मयुरी दत्ता पवार हिने अल्पवयातच साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत “आशाओ का मिराज” ह्या हिंदी भाषेतील ललित बंधाचे संकलन करून साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले आहे . एवढ्या लहान वयात ललित बंधाचे संकलन करून तिने शाळेचे, पालकांचे व उमरखेड शहराचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या यशामागे स्वरांजलीच्या आई-वडिलांचे मोलाचे योगदान असून, त्यांनी तिच्या लेखनकौशल्याला योग्य दिशा देत सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्वरांजलीला आपल्या कल्पना, भावना आणि विचार “आशाओ का मिराज” या ललित बंधाचे माध्यमातून प्रभावीपणे मांडता आले. संस्कार पोदार लर्न स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साहित्य, कला आणि विविध सर्जनशील उपक्रमांमध्येही आपली चमक दाखवली असून, स्वरांजलीची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वरांजलीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळातील राजेश देशमुख, अजय क्षीरसागर, निशांत बयास, धीरज बगाडे, प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार, शिक्षक वृंद यांनी तिचे विशेष कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. अल्पवयातच ललितबंध संकलन व प्रकाशन करणाऱ्या स्वरांजलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्वरांजलीच्या या उपक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.

- Post by Sk Chand1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- कछरा का दिकत1
- Post by Today One Live1
- यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधुन वगळल्याने शेतकरी चांगलाचं संतप्त झालेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्याला तीन तीन मंञीपद असतांना पीक विमा जिल्ह्याला मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चळवळीने यवतमाळ जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयात मुक्काम पोस्ट आंदोलन केलं. प्राध्यापक पंढरी पाठे यांनी यावेळी शेतक-यांची व्यथा मांडली.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.1
- Post by Today One Live1