logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज; ठाणे विभागाने केले ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन ठाणे:उन्हाळी सुट्टीसाठी एसटीचा ठाणे विभाग सज्ज झाला असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागातील आठ आगारांतून नियमित आणि अतिरिक्त अशा एकूण ४९९ बसफेऱ्या विविध मार्गांवर धावणार आहेत. एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगामासाठी ५७ अतिरिक्त बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नियमित २८६ फेऱ्याही सुरू राहणार आहेत. या सर्व फेऱ्या मिळून एकूण ४९९ बसफेऱ्या कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांकडे धावणार आहेत. दरम्यान, एसटी प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन केले असून गर्दीच्या काळात अतिरिक्त बसफेऱ्यांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर, चिपळूण, सातारा, धुळे, संभाजीनगर, जळगाव, शिर्डी, अहिल्यानगर, दापोली, रत्नागिरी, साक्री, वडुज इत्यादी प्रमुख मार्गांवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीने विशेष नियोजन केले आहे. ठाणे एक, ठाणे दोन, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, वाडा आदी आठ आगारांतून या बससेवा सुरू राहणार आहेत.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
e467ece7-c785-4dd6-af60-78a0805eb069

उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज; ठाणे विभागाने केले ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन ठाणे:उन्हाळी सुट्टीसाठी एसटीचा ठाणे विभाग सज्ज झाला असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागातील आठ आगारांतून नियमित आणि अतिरिक्त अशा एकूण ४९९ बसफेऱ्या विविध मार्गांवर धावणार आहेत. एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगामासाठी ५७ अतिरिक्त बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नियमित २८६ फेऱ्याही सुरू राहणार आहेत. या सर्व फेऱ्या मिळून एकूण ४९९ बसफेऱ्या कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांकडे धावणार आहेत. दरम्यान, एसटी प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन केले असून गर्दीच्या काळात अतिरिक्त बसफेऱ्यांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर, चिपळूण, सातारा, धुळे, संभाजीनगर, जळगाव, शिर्डी, अहिल्यानगर, दापोली, रत्नागिरी, साक्री, वडुज इत्यादी प्रमुख मार्गांवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीने विशेष नियोजन केले आहे. ठाणे एक, ठाणे दोन, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, वाडा आदी आठ आगारांतून या बससेवा सुरू राहणार आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चेंबूर:प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ महाराज, यांच्या पालखी पादुकांचे आगमन थेट श्री क्षेत्र अक्कलकोट ,या पुण्यभूमीतून चेंबूर गांवठाण, श्री साई सेवा समिती या ठिकाणी रविवार दि. ३/०५/२०२६.रोजी सकाळी ९:३० वाजता होत आहे. त्यानिमित्ताने श्री साई सेवा समिती यांच्या वतीने ,श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन,श्री साई सेवा समिती अध्यक्ष,श्री जितेश प्र. परळकर यांनी केले आहे.
    1
    चेंबूर:प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ महाराज, यांच्या पालखी पादुकांचे आगमन थेट श्री क्षेत्र अक्कलकोट ,या पुण्यभूमीतून चेंबूर गांवठाण, श्री साई सेवा समिती या ठिकाणी रविवार दि. ३/०५/२०२६.रोजी सकाळी ९:३० वाजता होत आहे. त्यानिमित्ताने श्री साई सेवा समिती यांच्या वतीने ,श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन,श्री साई सेवा समिती अध्यक्ष,श्री जितेश प्र. परळकर यांनी केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 📍 सुरत (गुजरात) रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली. 🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. 😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. ⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS
    1
    🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज
📍 सुरत (गुजरात)
रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली.
🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली.
😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
#बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • कैसा हराया से फेमस हुई शहर शेख़ न अपने ऊपर लगे आरोप को किया खारिज क्या कहा देखिए BNN NEWS
    1
    कैसा हराया से फेमस हुई शहर शेख़ न अपने ऊपर लगे आरोप को किया खारिज क्या कहा देखिए BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes
    1
    नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मुंब्रा टीएमसी स्टेडियम के बंद स्विमिंग पूल को दोबारा से बनाया जाएगा जनता के लिए।#mumbra #viralvideo
    1
    मुंब्रा टीएमसी स्टेडियम के बंद स्विमिंग पूल को दोबारा से बनाया जाएगा जनता के लिए।#mumbra #viralvideo
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Thane, Maharashtra•
    22 hrs ago
  • नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद न्यूज़: बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा। विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है। इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई। #NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews
    1
    नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद
न्यूज़:
बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया।
इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा।
विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है।
इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई।
#NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती. ४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं. Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं. विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते. अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.
    1
    लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावा या अनुशंगाने विमानाने प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय ही अशी भीती प्रवाशांना होती.
४ तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही. तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांचा अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं.
Fly91 एअरलाईन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरश: रडू कोसळलं. तब्बल ४ तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांताने रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी ३ वाजता Fly91 च्या IC3401 या विमानाने हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं, संध्याकाळी ४:३० वाजता विमान लँड होणार होतं. पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जातंय असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुशे त्याने लॅण्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन नाही तर 4 तास विमान आकाशात फिरत होतं.
विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. यामुळे तब्बल ४ तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागांत आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते, काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. ४ तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही? हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरुप लॅण्डिंगसाठी प्रार्थना करत होते.
अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीने विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथे संध्याकाळी ७:३० वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, एअरलाईन्सने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला.
विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जात आहे. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकाने कौशल्य दाखवून सुरक्षित लॅण्डिंग केलं. मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळे वैमानिकाचं कौतुक होत आहे. पण हे नेमकं कशामुळे घडलं, यामागे कारण काय होतं याचा तपास केला जात आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.