ईद-ए-मिलादनिमित्त चांदवडला भव्य मिरवणूक; शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे संपूर्ण जगाला शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवानिमित्त ईद-ए-मिलाद सण चांदवड शहरात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे उभारले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सोमवार पेठ, शिवनेरी चौक, नाईकवाडा, पुरा, मुल्लावाडा, शिवनेरी आदी प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत शाही जामा मस्जिद येथे पोहोचली. मिरवणुकीत मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. विविध ठिकाणी उभारलेले आकर्षक देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीची सांगता शाही जामा मस्जिद येथे झाली. त्यानंतर चांदवड शहरातील सर्व समाजबांधव एकत्रित येत शाही मस्जिद येथे नियाज अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यात सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी होत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी मुस्लीमबहुल मोहल्ला, घरे, दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट केली होती. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, नगरसेवक राजू बागवान, चामको बँकेचे संचालक जाहिद घाशी, अल्ताफ शेख, तौसीफ खान, वसीम तांबोळी, जावेद कादरी, मोबीम तांबोळी, वसीम शेख, समीर पठाण, दानिश शेख, सलीम मणियार, शाहनवाज शाह, जुबेर शाह, वासिफ खान, राजू खान, रिजवान घाशी, मजिद खान यांच्यासह मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.

- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.1
- مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام1
- मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.1