*नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी;* *सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड दि. 17 मार्च : नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या सन 2025-26 च्या सुधारित व सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, लेखाधिकारी विशाल हिवरे यांची उपस्थिती होती. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी 1 कोटी 16 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून खेळाचे मैदान विकसीत करणे व क्रिडा साहित्य पुरविण्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. करिअर मार्गदर्शन व अकरावी-बारावीतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रज्ञा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी 32 लक्ष रू. ची तरतूद करण्यात आली आहे. माळेगावसह इतर यात्रेसाठी 75 लाख रुपयाची तरतूद आहे. ग्रामीण भागात होणारे श्वानदंश व साप चावून होणारे मृत्यु रोखण्यासाठी आवश्यक इंजेक्शनासाठी 20 लक्ष, प्राथमिक आरोय केंद्रातील अत्याधुनिक प्रसूती कक्षा साठी 20 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय आरोग्य केंद्र NQAS करणे, आरोग्य दूत योजना राबविणे, क्षयरोग मूक्त गाव अशा वैशिष्टपूर्ण योजना राबविणे करिता एकूण 45 लक्ष रू. ची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांसाठी 1 कोटी 56 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, चारचाकी वाहन खरेदीसाठी अनुदान, विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी मदत तसेच गर्भवती माता व बालकांच्या सुरक्षेसाठी अॅनोमली स्कॅनसाठी 40 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीही 1 कोटी 16 लक्ष रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शेती क्षेत्रात ड्रोन खरेदीसाठी 12 लक्ष रुपये, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 12 लक्ष, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी 16 लक्ष रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 18 लक्ष रुपयांची मदत देण्यात येणार आहे. प्रिसीजन फार्मिंग योजनेसाठी 11 लक्ष रुपयांची तरतूद आहे. पशुधन विभागाकरिता 90 लक्ष रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. यामध्ये औषधी, ईमारत दुरुस्ती, लस वाहतुक याचा समावेश आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी 45 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल विकासासाठी 78 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, ड्युअल डेस्क व भांडी पुरविणे तसेच घटस्फोटित व विधवा महिलांच्या पाल्यांना सहाय्य देण्यात येणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्पांसाठी 57 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी तब्बल 4 कोटी 65 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गती देण्यासाठी 78 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे. हा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, दर्जेदार शिक्षण व सक्षम आरोग्य सेवा यावर आधारित असून ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासाला गती देणारा ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. *चौकट* *अर्थसंकल्पातील ठळक बाबी* ▪ एकूण अर्थसंकल्प- 23 कोटी 26 लक्ष रुपये ▪ पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 4 कोटी 65 लक्ष रुपये ▪ सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याणासाठी मिळून 2 कोटी 72 लक्ष रुपये चौकट *प्राधान्याच्या योजना* ▪ प्रज्ञा प्रकल्प- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन ▪ आधुनिक शेती- ड्रोन, प्रिसीजन फार्मिंग ▪ आरोग्य सेवा- आरोग्यदूत उपक्रम, क्षयरोगमुक्त गाव अभियान
*नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी;* *सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त
नांदेड दि. 17 मार्च : नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या सन 2025-26 च्या सुधारित व सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, लेखाधिकारी विशाल हिवरे यांची उपस्थिती होती. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी 1 कोटी 16 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून खेळाचे मैदान विकसीत करणे व क्रिडा साहित्य पुरविण्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. करिअर मार्गदर्शन व अकरावी-बारावीतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रज्ञा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी 32 लक्ष रू. ची तरतूद करण्यात आली आहे. माळेगावसह इतर यात्रेसाठी 75 लाख रुपयाची तरतूद आहे. ग्रामीण भागात होणारे श्वानदंश व साप चावून होणारे मृत्यु रोखण्यासाठी आवश्यक इंजेक्शनासाठी 20 लक्ष, प्राथमिक आरोय केंद्रातील अत्याधुनिक प्रसूती कक्षा साठी 20 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय आरोग्य केंद्र NQAS करणे, आरोग्य दूत योजना राबविणे, क्षयरोग मूक्त गाव अशा वैशिष्टपूर्ण योजना राबविणे करिता एकूण 45 लक्ष रू. ची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांसाठी
1 कोटी 56 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, चारचाकी वाहन खरेदीसाठी अनुदान, विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी मदत तसेच गर्भवती माता व बालकांच्या सुरक्षेसाठी अॅनोमली स्कॅनसाठी 40 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीही 1 कोटी 16 लक्ष रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शेती क्षेत्रात ड्रोन खरेदीसाठी 12 लक्ष रुपये, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 12 लक्ष, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी 16 लक्ष रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 18 लक्ष रुपयांची मदत देण्यात येणार आहे. प्रिसीजन फार्मिंग योजनेसाठी 11 लक्ष रुपयांची तरतूद आहे. पशुधन विभागाकरिता 90 लक्ष रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. यामध्ये औषधी, ईमारत दुरुस्ती, लस वाहतुक याचा समावेश आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी 45 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल विकासासाठी 78 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, ड्युअल डेस्क व भांडी पुरविणे तसेच घटस्फोटित व विधवा महिलांच्या पाल्यांना सहाय्य देण्यात येणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्पांसाठी 57 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी तब्बल 4 कोटी 65 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गती देण्यासाठी 78 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे. हा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, दर्जेदार शिक्षण व सक्षम आरोग्य सेवा यावर आधारित असून ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासाला गती देणारा ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. *चौकट* *अर्थसंकल्पातील ठळक बाबी* ▪ एकूण अर्थसंकल्प- 23 कोटी 26 लक्ष रुपये ▪ पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 4 कोटी 65 लक्ष रुपये ▪ सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याणासाठी मिळून 2 कोटी 72 लक्ष रुपये चौकट *प्राधान्याच्या योजना* ▪ प्रज्ञा प्रकल्प- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन ▪ आधुनिक शेती- ड्रोन, प्रिसीजन फार्मिंग ▪ आरोग्य सेवा- आरोग्यदूत उपक्रम, क्षयरोगमुक्त गाव अभियान
- Post by Today One Live1
- वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia1
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- हिमायतनगरात आंदोलन तीव्र – ‘ रविवार बंद’ चा इशारा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. 👉 “जागा मिळेपर्यंत माघार नाही” – उपोषणकर्त्यांचा निर्धार 👉 नगरपंचायतीच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये संताप 👉 प्रहार जनशक्तीकडून रविवारी हिमायतनगर बंदचा इशारा 🔥 वाढता पाठिंबा… वाढतं आंदोलन… निर्णयाची प्रतीक्षा! #Himayatnagar #ShivajiMaharaj #HimayatnagarBandh #Prahar #Maharashtra BreakingNews MarathiNews LocalNews1