logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेगाव येथे 'ओम साई प्रतिष्ठान'च्या वतीने राबविण्यात येणारी "विद्यार्थी दत्तक योजना – वर्ष तिसरे" हा उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत गावातील २५ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी खिलारे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैया ढोणे, डॉ. संभाजी देशमुख, शेगाव सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन धोंडीराम गुंडा माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष अनुराधा निकम, सुभेदार मेजर शिवाजी बोराडे, केंद्रप्रमुख शेंडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, नवनाथ निकम, विशाल माने आणि धनाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी ओम साई प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील दानशूर व्यक्ती, देणगीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे सांगत, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम सुरू राहतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष बबलू शिंदे यांनी व्यक्त केला. शेवटी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवर, देणगीदार, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

5 hrs ago
user_सारथी महाराष्ट्राचा न्यूज
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
Voice of people जत, सांगली, महाराष्ट्र•
5 hrs ago
0d759dae-3681-4435-8aae-e08c8059a95a

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेगाव येथे 'ओम साई प्रतिष्ठान'च्या वतीने राबविण्यात येणारी "विद्यार्थी दत्तक योजना – वर्ष तिसरे" हा उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत गावातील २५ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी खिलारे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैया ढोणे, डॉ. संभाजी देशमुख, शेगाव सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन धोंडीराम गुंडा माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष अनुराधा निकम, सुभेदार मेजर शिवाजी बोराडे, केंद्रप्रमुख शेंडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, नवनाथ निकम, विशाल माने आणि धनाजी

3cb221fe-43e5-4279-bc10-09aadb80b67b

पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी ओम साई प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील दानशूर व्यक्ती, देणगीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे सांगत, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम सुरू राहतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष बबलू शिंदे यांनी व्यक्त केला. शेवटी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवर, देणगीदार, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी आपल्या आक्रमक भाषणाने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि 'उबाठा' पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी 'उबाठा' पक्षाचा उल्लेख 'बोभाटा' पक्ष असा करत त्यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मुंबईत पावसाळ्यात झालेल्या दुर्घटनांचे समर्थन आम्ही कधीही करणार नाही, या वेदनादायी घटना असून आमचा पक्ष अत्यंत संवेदनशील आहे, अशी ठाम भूमिका सातम यांनी मांडली. महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईकरांच्या प्रश्नांवर पूर्णपणे जागरूक असल्याचे प्रीती सातम यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांनी आजवरच्या अनेक वर्षांत जे कडक शासन पाहिले नाही, ते महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून दाखवून दिले आहे, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाकडून होत असलेल्या महापौरपदाच्या राजीनाम्याच्या मागणीचा खरपूस समाचार घेतला.
    1
    बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी आपल्या आक्रमक भाषणाने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि 'उबाठा' पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी 'उबाठा' पक्षाचा उल्लेख 'बोभाटा' पक्ष असा करत त्यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मुंबईत पावसाळ्यात झालेल्या दुर्घटनांचे समर्थन आम्ही कधीही करणार नाही, या वेदनादायी घटना असून आमचा पक्ष अत्यंत संवेदनशील आहे, अशी ठाम भूमिका सातम यांनी मांडली.

महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईकरांच्या प्रश्नांवर पूर्णपणे जागरूक असल्याचे प्रीती सातम यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांनी आजवरच्या अनेक वर्षांत जे कडक शासन पाहिले नाही, ते महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून दाखवून दिले आहे, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाकडून होत असलेल्या महापौरपदाच्या राजीनाम्याच्या मागणीचा खरपूस समाचार घेतला.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    1
    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    1
    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    1
    पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पुण्याच्या भोर नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये सुरू असलेल्या फर्निचरच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. भाजप नगरसेवकांनी या केबिनमधील कामाबाबत अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवर उत्तर देताना मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. नगराध्यक्षांच्या केबिनमधील संबंधित फर्निचरच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे।
    1
    पुण्याच्या भोर नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये सुरू असलेल्या फर्निचरच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. भाजप नगरसेवकांनी या केबिनमधील कामाबाबत अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला होता.

या तक्रारीवर उत्तर देताना मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. नगराध्यक्षांच्या केबिनमधील संबंधित फर्निचरच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे।
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • गिरणार येथे पर्यटनासाठी आलेल्या एका लहान मुलावर सिंहाने हल्ला केला आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून आज गिरणार हे पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
    1
    गिरणार येथे पर्यटनासाठी आलेल्या एका लहान मुलावर सिंहाने हल्ला केला आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून आज गिरणार हे पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
    user_महेश दिलीप ढोबळे
    महेश दिलीप ढोबळे
    Metal Construction Company कागल, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.