ज्ञानप्रकाशच्या सलग १० व्या बॅचचा १०० टक्के निकाल ... तीन विद्यार्थी १०० टक्के तर ४५ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा १० वी बोर्ड परीक्षा निकाल आज जाहीर झाला . ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राचा गेल्या अनेक वर्षांच्या निकालाप्रमाणे याही वर्षी 10 वी परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. प्रयोगशील व उपक्रमशील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात मुलांसाठी केवळ अभ्यासच नाही तर व्यक्तीमत्व विकासाच्या अनेक संधी उपलब्ध असतात . त्यातून मुलांचे अनुभव आणि भावविश्व विस्तारित होत जाते .कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यावर आधारित उपक्रमाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विशेष व्यक्तींच्या भेटी आणि संवादातूनही भविष्यातील संधी शोधण्याची दृष्टी आणि आवडी जोपासण्याचा मंत्र दिला जातो. वर्षभरात अनेक उपक्रमांत सहभागी होऊनही मुलांनी संपादन केलेले यश कौतुकास्पद आहे . अनुभवी शिक्षक आणि दुरदृष्टी असणारे संस्थाचालक यांच्या सहवासात मुले ताणमुक्त वातावरणात शिकतात . प्रकल्पात मुलांना आनंदी वातावरणात शिकता यावं यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व समुपदेशन ही केले जाते. इथे त्यांना स्व-अभ्यासाची सवय लागते . त्यामुळे शालांत परीक्षेच्या निकालात हे परिणाम दिसून येतात.आज जाहीर झालेल्या निकालात एकूण 85 विद्यार्थी होते . त्यातून 3 विद्यार्थ्यांनी 100% गुण घेतले आहेत. यात अवधूत म्हेत्रे , हर्ष अपसिंगे आणि संस्कार राऊतराव यांचा समावेश आहे.तर 90% हुन अधिक गुण घेणारे 45 विद्यार्थी, 85 ते 90% गुण घेणाऱ्यांमध्ये 19 विद्यार्थी आहेत. इतर सर्व विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी , पालक व शिक्षकांचे अभिनंदन प्रकल्पप्रमुख सतीश नरहरे व संचालिका , मुख्याध्यापिका, सविता नरहरे , उपमुख्याध्यापक शिवशंकर राऊत , पर्यवेक्षक अशोक गुरदाळे , मार्गदर्शक प्रशांत शिंदे , वसंत पाटील , संतोष आळंदकर , शुभदा पाठक , शिवकांता जाधव , सुचेता चाकूरकर , विठ्ठल अलमलकर , जावेद सर आणि सर्व शिक्षकांनी केले .

- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी1
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1