Shuru
Apke Nagar Ki App…
धावत्या दुचाकीवरून पत्नीला ढकलले पत्नीचा जागीच मृत्यू उत्तर प्रदेशातील रामपूर येथील घटना
चंद्रकला हेमंत वळवी
धावत्या दुचाकीवरून पत्नीला ढकलले पत्नीचा जागीच मृत्यू उत्तर प्रदेशातील रामपूर येथील घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- Post by गणेश मौर्य1
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2