logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव जिल्ह्यातील गोतस्करी प्रकरणाची मंत्रालयाकडून दखल; स्थानिक स्तरावर प्रतिसादाची प्रतीक्षा. सामाजिक कार्यकर्ता किरण आनंदा माळी यांच्या निवेदनानंतर गृह व पशुसंवर्धन विभागाकडे प्रकरण वर्ग पाळधी (ता. धरणगाव) | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे उघडकीस आलेल्या गोतस्करी प्रकरणानंतर राज्य स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ता किरण आनंदा माळी यांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री सचिवालयाने सदर प्रकरण गृह विभाग तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग केले आहे. ८ एप्रिल रोजी पाळधी येथे पोलिसांनी गोवंश जनावरांची सुटका केली होती. संबंधित कारवाईचे स्वागत होत असताना, अशा घटना वारंवार का घडतात, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६ (सुधारित २०१५) अंतर्गत गोवंश कत्तल व अवैध वाहतुकीवर बंदी असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत आहे. किरण माळी यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेलद्वारे सादर केलेल्या निवेदनात गोतस्करी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथक स्थापन करणे, संवेदनशील भागात नियमित गस्त वाढवणे तसेच चेकपोस्टद्वारे वाहन तपासणी कडक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त पत्रानुसार सदर प्रकरणावर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर आता वरिष्ठ स्तरावर लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, मंत्रालयाकडून प्रकरण पुढे पाठविल्यानंतरही जिल्हास्तरावर अद्याप अधिकृत प्रतिसाद किंवा अंमलबजावणीबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ■ *पाठपुरावा सोडणार नाही; किरण माळी यांचा इशारा* मंत्रालयाकडून दाद मिळाल्यामुळे या लढ्याला बळ मिळाले आहे. “स्थानिक प्रशासन केवळ घटनेनंतर कारवाई करते; मात्र, घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निर्देशांचे स्थानिक स्तरावर काय झाले, याचा आम्ही माहिती अधिकारांतर्गत पाठपुरावा करणार आहोत,” असा इशारा किरण आनंदा माळी यांनी दिला आहे.

on 13 April
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
on 13 April
d12cc90f-72a8-460a-981a-d9b2429ee625

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Ravindar R Wade
    1
    Post by Ravindar R Wade
    user_Ravindar R Wade
    Ravindar R Wade
    चोपडा, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Electrician सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    16 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    1
    सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Gani Bhai
    1
    Post by Gani Bhai
    user_Gani Bhai
    Gani Bhai
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Electrician सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.