logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कल्पना जिनीगं आग प्रकरण अकृषक परवाना नसताना ९ वर्षे जिनिंग सुरू;  हायव्होल्टेज लाईन आणि उघड्या तारांनी घेतला चिमुरड्याचा बळी ​   कुही(जि.नागपूर-शरद शहारे): कुही तालुक्यातील भंडारबोडी येथील ‘कल्पना जिनिंग’मध्ये लागलेली आग आणि त्यात झालेल्या बालमृत्यू प्रकरणाला आता एक खळबळजनक वळण मिळाले आहे. या जिनिंगमध्ये सुरक्षेचे नियम केवळ धाब्यावरच बसवले नव्हते, तर चक्क जमिनीच्या अकृषक (NA) वापराचे नियम आणि बँकिंग व्यवहारांतही मोठी फेरफार केल्याचे उघड होत आहे. नऊ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या या जिनिंगमधील ‘हाय व्होल्टेज’ ड्रॅगडीने अखेर एका निष्पाप चिमुरड्याचा बळी घेतला आहे. ​पुराव्यासह धक्कादायक खुलासे: ​१. मृत्यूच्या छताखाली जिनिंग: बातमीसोबत असलेल्या फोटोत स्पष्ट दिसते की, जिनिंगच्या अगदी वरून हायव्होल्टेज थ्री-फेज विद्युत वाहिनी जात आहे. मूळ शेतात असलेली ही लाईन जिनिंग बांधताना हटवणे आवश्यक होते, मात्र मालकाने ती तशीच ठेवून नियम धाब्यावर बसवले. अनेक ठिकाणी वायरिंग उघडी असून, यामुळेच १२ फेब्रुवारीला शॉर्टसर्किट होऊन आग लागली आणि कापसाच्या ढिगाऱ्यात रोहनचा करुण अंत झाला. ​२. अकृषक (NA) परवान्याचा सावळा गोंधळ: जिनिंग नऊ वर्षांपासून सुरू करताना फक्त पावणे दोन एकर जमिनीचा (भूमापन क्र. 18) औद्योगिक वापरासाठी अकृषक परवाना होता तर सव्वा पाच एकर जमिनीचा (भूमापन क्र. १७) अकृषक परवाना चक्क ११ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला. प्रश्न असा उरतो की, गेल्या नऊ वर्षांपासून विना-परवाना ही जिनिंग सुरू कशी होती? प्रशासनाने या बेकायदेशीर बांधकामाकडे डोळेझाक का केली? ​३. ३५ कोटींचे रहस्यमयी कर्ज आणि आग: अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सव्वा पाच एकर जागा आणि जिनिंग बँकेकडे गहाण ठेवून ३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद ७/१२ वर करण्यात आली. कर्ज घेतल्याच्या अवघ्या सात दिवसांत (१२ फेब्रुवारी) भीषण आग लागते, हे केवळ योगायोग असू शकत नाही. विमा हडपण्यासाठी किंवा कर्जाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी हा रचलेला कट तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे. ​४. मजुरांच्या जीवाशी खेळ: जिनिंगच्या आवारातच मजुरांच्या निवासी खोल्या आहेत. कापूस साठवण्याची जागा आणि राहत्या खोल्या यात साधी सुरक्षा भिंतही नाही. कापूस हा ज्वालाग्राही असताना मजुरांच्या लेकरांना आगीच्या तोंडावर ठेवण्याचे पातक या व्यवस्थापनाने केले आहे. ​प्रशासनाला विचारलेले टोकदार प्रश्न: ​नगर रचना विभाग: ९ वर्षे विना-NA जमीन वापरावर जिनिंग कशी सुरू होती? ​महावितरण: हायव्होल्टेज लाईनच्या खाली जिनिंगला परवानगी कोणी दिली? उघड्या वायरिंगवर कारवाई का झाली नाही? ​बँक प्रशासन: ज्या जागेचा वापर वादग्रस्त आहे, तिथे ३५ कोटींचे कर्ज वाटप करताना स्थळ पाहणी (Site Visit) का केली नाही? ​पोलीस विभाग: या प्रकरणात केवळ 'अपघात' म्हणून नोंद न करता, 'मनुष्यवधाचा' आणि 'आर्थिक फसवणुकीचा' गुन्हा दाखल करणार का? ​मानवीय वास्तव एकीकडे ३५ कोटींच्या कर्जाचे आणि विम्याचे आकडे फिरत असताना, मध्यप्रदेशातून आलेल्या त्या गरीब मजुराच्या पोटी जन्माला आलेला ४ वर्षांचा रोहन आज या जगातून गेला आहे. त्याच्या मृत्यूला ही भ्रष्ट व्यवस्था जबाबदार नाही का? असा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मांढळ संजय भोतमांगे यांनी केला तर याबाबत माहिती घेऊन संबंधीत विभागामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे.- अमित घाटगे, तहसीलदार,कुही यांनी सांगितले

14 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
14 hrs ago
5277ad14-c9bf-429f-b66f-86c4991b25c0

कल्पना जिनीगं आग प्रकरण अकृषक परवाना नसताना ९ वर्षे जिनिंग सुरू;  हायव्होल्टेज लाईन आणि उघड्या तारांनी घेतला चिमुरड्याचा बळी ​   कुही(जि.नागपूर-शरद शहारे): कुही तालुक्यातील भंडारबोडी येथील ‘कल्पना जिनिंग’मध्ये लागलेली आग आणि त्यात झालेल्या बालमृत्यू प्रकरणाला आता एक खळबळजनक वळण मिळाले आहे. या जिनिंगमध्ये सुरक्षेचे नियम केवळ धाब्यावरच बसवले नव्हते, तर चक्क जमिनीच्या अकृषक (NA) वापराचे नियम आणि बँकिंग व्यवहारांतही मोठी फेरफार केल्याचे उघड होत आहे. नऊ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या या जिनिंगमधील ‘हाय व्होल्टेज’ ड्रॅगडीने अखेर एका निष्पाप चिमुरड्याचा बळी घेतला आहे. ​पुराव्यासह धक्कादायक खुलासे: ​१. मृत्यूच्या छताखाली जिनिंग: बातमीसोबत असलेल्या फोटोत स्पष्ट दिसते की, जिनिंगच्या अगदी वरून हायव्होल्टेज थ्री-फेज विद्युत वाहिनी जात आहे. मूळ शेतात असलेली ही लाईन जिनिंग बांधताना हटवणे आवश्यक होते, मात्र मालकाने ती तशीच ठेवून नियम धाब्यावर बसवले. अनेक ठिकाणी वायरिंग उघडी असून, यामुळेच १२ फेब्रुवारीला शॉर्टसर्किट होऊन आग लागली आणि कापसाच्या ढिगाऱ्यात रोहनचा करुण अंत झाला. ​२. अकृषक (NA) परवान्याचा सावळा

b10aca3c-fe82-4b4a-9b01-2241ac792807

गोंधळ: जिनिंग नऊ वर्षांपासून सुरू करताना फक्त पावणे दोन एकर जमिनीचा (भूमापन क्र. 18) औद्योगिक वापरासाठी अकृषक परवाना होता तर सव्वा पाच एकर जमिनीचा (भूमापन क्र. १७) अकृषक परवाना चक्क ११ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला. प्रश्न असा उरतो की, गेल्या नऊ वर्षांपासून विना-परवाना ही जिनिंग सुरू कशी होती? प्रशासनाने या बेकायदेशीर बांधकामाकडे डोळेझाक का केली? ​३. ३५ कोटींचे रहस्यमयी कर्ज आणि आग: अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सव्वा पाच एकर जागा आणि जिनिंग बँकेकडे गहाण ठेवून ३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद ७/१२ वर करण्यात आली. कर्ज घेतल्याच्या अवघ्या सात दिवसांत (१२ फेब्रुवारी) भीषण आग लागते, हे केवळ योगायोग असू शकत नाही. विमा हडपण्यासाठी किंवा कर्जाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी हा रचलेला कट तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे. ​४. मजुरांच्या जीवाशी खेळ: जिनिंगच्या आवारातच मजुरांच्या निवासी खोल्या आहेत. कापूस साठवण्याची जागा आणि राहत्या खोल्या यात साधी सुरक्षा भिंतही

c3d10b99-87c3-4b96-832b-499f82adfd5a

नाही. कापूस हा ज्वालाग्राही असताना मजुरांच्या लेकरांना आगीच्या तोंडावर ठेवण्याचे पातक या व्यवस्थापनाने केले आहे. ​प्रशासनाला विचारलेले टोकदार प्रश्न: ​नगर रचना विभाग: ९ वर्षे विना-NA जमीन वापरावर जिनिंग कशी सुरू होती? ​महावितरण: हायव्होल्टेज लाईनच्या खाली जिनिंगला परवानगी कोणी दिली? उघड्या वायरिंगवर कारवाई का झाली नाही? ​बँक प्रशासन: ज्या जागेचा वापर वादग्रस्त आहे, तिथे ३५ कोटींचे कर्ज वाटप करताना स्थळ पाहणी (Site Visit) का केली नाही? ​पोलीस विभाग: या प्रकरणात केवळ 'अपघात' म्हणून नोंद न करता, 'मनुष्यवधाचा' आणि 'आर्थिक फसवणुकीचा' गुन्हा दाखल करणार का? ​मानवीय वास्तव एकीकडे ३५ कोटींच्या कर्जाचे आणि विम्याचे आकडे फिरत असताना, मध्यप्रदेशातून आलेल्या त्या गरीब मजुराच्या पोटी जन्माला आलेला ४ वर्षांचा रोहन आज या जगातून गेला आहे. त्याच्या मृत्यूला ही भ्रष्ट व्यवस्था जबाबदार नाही का? असा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मांढळ संजय भोतमांगे यांनी केला तर याबाबत माहिती घेऊन संबंधीत विभागामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे.- अमित घाटगे, तहसीलदार,कुही यांनी सांगितले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन ता. प्रतिनिधी कुही :- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले. बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले. कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन
सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन
ता. प्रतिनिधी कुही :- 
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले.
बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला.
विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले.
कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    7 hrs ago
  • नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    1
    कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | 
#KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏
#drmeherabbas
#hearthealth 
#routinehearttest 
#HeartHealthAwareness 
#heartattack 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    8 hrs ago
  • जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता अमेठी पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    1
    जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता 
अमेठी 
पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है 
बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    user_Madusoodan
    Madusoodan
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव कुही (शरद शहारे) कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव 
कुही (शरद शहारे)
कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.