logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिल्ली येथील तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ आणि २४ जुलै रोजी होणाऱ्या स्टेअर्स युथ गेम्स राष्ट्रीय कराटे स्पर्धा २०२५-२६ साठी जालना जिल्ह्यातील १५ गुणवान कराटेपटू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या टीम मॅनेजरपदी जालन्याचे सेन्साई रूपेंद्र गोपाल पारचा यांची नियुक्ती झाली असून हा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवणाऱ्या जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये कु. निवांशी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. अनुष्का किशोर म्हेत्रे (नवयुवक गणेश माध्यमिक विद्यालय), कु. तन्वी नितीन खरटमल (राजश्री शाहू इंग्लिश स्कूल), कु. आरुषी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. वैष्णवी बाबासाहेब लोखंडे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), कु. आकांक्षा शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन विद्यालय), कु. वैष्णवी संतोष लुटे (राष्ट्रीय हिंदी विद्यालय इंग्लिश मीडियम), कु. दिव्यता अजितराज कोठारी (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), कु. लावण्या किशोर गुडला (जे.ई.एस. कॉलेज), कु. पूर्वा सुजित माने (श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज, रामनगर), ऋषिकेश गणेश श्रीराम (नारायणा ई-टेक्नो स्कूल), यशवर्धन शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), नयन धनराज गोमतीवाले (जे.ई.एस. कॉलेज), शेलमॉन योहान गुडेकर (जे.ई.एस. कॉलेज) आणि ओंकार गुट्टे (जे.ई.एस. कॉलेज) यांचा समावेश आहे. या सर्वांना जालना जिल्ह्याचे चीफ को-ऑर्डिनेटर सेन्साई रूपेंद्र पारचा तसेच प्रशिक्षक सेन्साई अमन पारचा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल स्टेअर्स जालना जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक शेळके, उपाध्यक्ष गणेश श्रीराम, उपाध्यक्ष प्रशांत पेम्बरती, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राहुल मांडोत, संजय भगत, रितेश अग्रवाल, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावर जालन्याच्या या खेळाडूंकडून सुवर्णपदकांसह उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

8 hrs ago
user_सय्यद अबरार
सय्यद अबरार
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
8 hrs ago

दिल्ली येथील तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ आणि २४ जुलै रोजी होणाऱ्या स्टेअर्स युथ गेम्स राष्ट्रीय कराटे स्पर्धा २०२५-२६ साठी जालना जिल्ह्यातील १५ गुणवान कराटेपटू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या टीम मॅनेजरपदी जालन्याचे सेन्साई रूपेंद्र गोपाल पारचा यांची नियुक्ती झाली असून हा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवणाऱ्या जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये कु. निवांशी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. अनुष्का किशोर म्हेत्रे (नवयुवक गणेश माध्यमिक विद्यालय), कु. तन्वी नितीन खरटमल (राजश्री शाहू इंग्लिश स्कूल), कु. आरुषी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. वैष्णवी बाबासाहेब लोखंडे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), कु. आकांक्षा शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन विद्यालय), कु. वैष्णवी संतोष लुटे (राष्ट्रीय हिंदी विद्यालय इंग्लिश मीडियम), कु. दिव्यता अजितराज कोठारी (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), कु. लावण्या किशोर गुडला (जे.ई.एस. कॉलेज), कु. पूर्वा सुजित माने (श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज, रामनगर), ऋषिकेश गणेश श्रीराम (नारायणा ई-टेक्नो स्कूल), यशवर्धन शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), नयन धनराज गोमतीवाले (जे.ई.एस. कॉलेज), शेलमॉन योहान गुडेकर (जे.ई.एस. कॉलेज) आणि ओंकार गुट्टे (जे.ई.एस. कॉलेज) यांचा समावेश आहे. या सर्वांना जालना जिल्ह्याचे चीफ को-ऑर्डिनेटर सेन्साई रूपेंद्र पारचा तसेच प्रशिक्षक सेन्साई अमन पारचा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल स्टेअर्स जालना जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक शेळके, उपाध्यक्ष गणेश श्रीराम, उपाध्यक्ष प्रशांत पेम्बरती, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राहुल मांडोत, संजय भगत, रितेश अग्रवाल, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावर जालन्याच्या या खेळाडूंकडून सुवर्णपदकांसह उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच परवा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. "क्षत्रिय मराठे आम्ही शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर महाराष्ट्रातील मराठा समाज दिल्लीच्या छातीवर येऊन बसेल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे जंतर-मंतरवरील या आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    2
    मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच परवा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. "क्षत्रिय मराठे आम्ही शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर महाराष्ट्रातील मराठा समाज दिल्लीच्या छातीवर येऊन बसेल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे जंतर-मंतरवरील या आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Santram Jadhav
    Santram Jadhav
    Jalna, Maharashtra•
    6 hrs ago
  • लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांना आंदोलन करू द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत जाणार आहेत. आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा माज उतरवणार, असा थेट इशारा त्यांनी या वेळी केंद्र सरकारला दिला आहे. जरांगे आज सकाळी ११ वाजता दिल्लीत पोहोचणार असून ते आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील हे सोनम वांगचूक यांनाही आपला पाठिंबा देणार आहेत.
    1
    लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांना आंदोलन करू द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत जाणार आहेत. आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा माज उतरवणार, असा थेट इशारा त्यांनी या वेळी केंद्र सरकारला दिला आहे.

जरांगे आज सकाळी ११ वाजता दिल्लीत पोहोचणार असून ते आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील हे सोनम वांगचूक यांनाही आपला पाठिंबा देणार आहेत.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत आणि अंबड चौफुली मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक व महिला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, राज्यभरात उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे सुरू असतानाही सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही, तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल आणि सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला दिला. दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवत या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आनंदराज आंबेडकर यांनी केली.
    1
    अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत आणि अंबड चौफुली मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक व महिला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, राज्यभरात उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे सुरू असतानाही सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही, तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल आणि सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला दिला.

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवत या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आनंदराज आंबेडकर यांनी केली.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये ड्रेनेज ब्लॉक, चुकीची रस्ता ढाल आणि अपुऱ्या जलनिकासी व्यवस्थेमुळे प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. रस्त्यावर तुंबलेल्या या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यास प्रचंड अडचणी येत असून, परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. स्वतंत्र शासकीय अभियंत्यांकडून प्रत्यक्ष तांत्रिक सर्वेक्षण करून ड्रेनेज सिस्टीम, रस्त्याची ढाल आणि मुख्य नाल्याची तपासणी करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या तपासणीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
    3
    जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये ड्रेनेज ब्लॉक, चुकीची रस्ता ढाल आणि अपुऱ्या जलनिकासी व्यवस्थेमुळे प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. रस्त्यावर तुंबलेल्या या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यास प्रचंड अडचणी येत असून, परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. स्वतंत्र शासकीय अभियंत्यांकडून प्रत्यक्ष तांत्रिक सर्वेक्षण करून ड्रेनेज सिस्टीम, रस्त्याची ढाल आणि मुख्य नाल्याची तपासणी करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या तपासणीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
    user_Jawed khan
    Jawed khan
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालन्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत आंबेडकरी समाजाने या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आपला लढा पुकारला आहे.
    1
    जालन्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत आंबेडकरी समाजाने या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आपला लढा पुकारला आहे.
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्याचे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंटयाल यांनी मुंबई येथील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. २२ तारखेला, बुधवारी सकाळी १० वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही भेट पार पडली. या प्रसंगी गोरंटयाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक यश मिळावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी भाजपचे नगरसेवक विरेंद्र धोका तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भेटीदरम्यान विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवरही थोडक्यात चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि जनकल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने ही सदिच्छा भेट पार पडली.
    1
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्याचे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंटयाल यांनी मुंबई येथील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. २२ तारखेला, बुधवारी सकाळी १० वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही भेट पार पडली. या प्रसंगी गोरंटयाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक यश मिळावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी भाजपचे नगरसेवक विरेंद्र धोका तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भेटीदरम्यान विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवरही थोडक्यात चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि जनकल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने ही सदिच्छा भेट पार पडली.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईच्या विरोधात जालन्यात काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. या घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी जालन्यात काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेत निदर्शने करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि राहुल गांधी यांच्यावरील या कारवाईमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून जालन्यात याविरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे.
    1
    दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईच्या विरोधात जालन्यात काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. या घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी जालन्यात काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेत निदर्शने करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि राहुल गांधी यांच्यावरील या कारवाईमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून जालन्यात याविरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे.
    user_GLOBAL NEWS JALNA
    GLOBAL NEWS JALNA
    सच बोलने की आदत है मुझे जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.