२३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती उपक्रम अहिल्यानगर, दि. १९- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने “२३ एप्रिलचा लोकशाही जागर” हा व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून निर्भय, निष्पक्ष व सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन स्वीप समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत राहुरी विधानसभा मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, महिला बचत गट तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दि. १८ एप्रिल रोजी मतदानाची शपथ दिली जाणार असून, १९ एप्रिल रोजी मतदान जनजागृतीसाठी डीपी स्टेटस ठेवणे, २० एप्रिल रोजी प्रसिद्ध व्यक्तींचे जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित करणे आणि २१ एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्भय मतदानासाठी आवाहन करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच २२ एप्रिल रोजी मतदानाची तारीख, वेळ व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांना “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीचे पावित्र्य राखू तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करू” अशी शपथ देण्यात येत आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी २३ एप्रिल रोजी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश दरेकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शिवगुंडे, मतदारदूत डॉ. अमोल बागूल तसेच स्वीप समितीच्या इतर सदस्यांनी केले आहे. #RahuriVotes #LokshahiJagar #SVEEP #Election2026 #CentPercentVoting #VoterAwareness #RahuriByePoll #DemocracyFestival #BeAnEnlightenedVoter #EthicalVoting #GoVote #अहिल्यानगर #राहुरी #मतदान_जागर #लोकशाहीचा_उत्सव #निर्भय_मतदान

- चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) सोनई पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. आरोपी: आसिफ आतीक कुरेशी (फरार) लियाकत इस्माईल कुरेशी (फरार) उबेद कुरेशी (फरार) (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) 2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी: सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर एकूण कारवाई: 2 गुन्हे दाखल 11 गोवंशीय जनावरे मुक्त 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार) ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.1
- सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .1
- येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला1
- Post by मन्सूर शेख1
- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला1
- येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.1