आशाताईंना पडली होती येवला पैठणीची भुरळ; कापसे परिवाराने जागवल्या आठवणी येवला: भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्णकाळ लाभलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आशाताईंचे आणि येवल्याचे एक वेगळेच नाते होते, ते म्हणजे येथील अस्सल 'येवला पैठणी'. आशाताई असोत किंवा भारतरत्न लता मंगेशकर, या दोघींनाही पैठणीचे मोठे वेड होते. विशेषतः आशाताईंना मोतिया (क्रीम) रंगाच्या पैठणीची विशेष भुरळ होती. येवल्यातील प्रसिद्ध कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले यांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, आशाताईंना ठराविक रंगांच्या आणि नक्षीकामाच्या पैठणीची मोठी आवड होती. अनेक कार्यक्रमांसाठी त्या खास मोतिया रंगाच्या विविध छटा असलेल्या पैठण्यांची ऑर्डर कापसे पैठणीकडे नोंदवत असत. त्यांच्या आवडीनुसार नक्षीकाम करून या पैठण्या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी घरपोच पाठवल्या जात. "आशाताईंसारखी थोर गायिका आमच्याकडील पैठणी आवडीने नेसायची, हा आमच्यासाठी मोठा सन्मान होता. त्यांच्या निधनाने केवळ संगीत क्षेत्राचीच नव्हे, तर येवल्याच्या विणकरांचा एक मोठा आधारवड हरपला आहे," अशा शब्दांत दिलीप खोकले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज आशाताई काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या, तरी त्यांनी नेसलेल्या येवल्याच्या पैठणीच्या रूपाने त्यांच्या आठवणी विणकरांच्या मनात सदैव जिवंत राहतील. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
आशाताईंना पडली होती येवला पैठणीची भुरळ; कापसे परिवाराने जागवल्या आठवणी येवला: भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्णकाळ लाभलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आशाताईंचे आणि येवल्याचे एक वेगळेच नाते होते, ते म्हणजे येथील अस्सल 'येवला पैठणी'. आशाताई असोत किंवा भारतरत्न लता मंगेशकर, या दोघींनाही पैठणीचे मोठे वेड होते. विशेषतः आशाताईंना मोतिया (क्रीम) रंगाच्या पैठणीची विशेष भुरळ होती. येवल्यातील प्रसिद्ध कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले यांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, आशाताईंना ठराविक रंगांच्या आणि नक्षीकामाच्या पैठणीची मोठी आवड होती. अनेक कार्यक्रमांसाठी त्या खास मोतिया रंगाच्या विविध छटा असलेल्या पैठण्यांची ऑर्डर कापसे पैठणीकडे नोंदवत असत. त्यांच्या आवडीनुसार नक्षीकाम करून या पैठण्या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी घरपोच पाठवल्या जात. "आशाताईंसारखी थोर गायिका आमच्याकडील पैठणी आवडीने नेसायची, हा आमच्यासाठी मोठा सन्मान होता. त्यांच्या निधनाने केवळ संगीत क्षेत्राचीच नव्हे, तर येवल्याच्या विणकरांचा एक मोठा आधारवड हरपला आहे," अशा शब्दांत दिलीप खोकले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज आशाताई काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या, तरी त्यांनी नेसलेल्या येवल्याच्या पैठणीच्या रूपाने त्यांच्या आठवणी विणकरांच्या मनात सदैव जिवंत राहतील. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
- 🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸 १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. #MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews1
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2
- येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजी नगर मधील अतुल सावे साहेब व माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ उपस्थित माननीय कल्याणजी काळे साहेब व माननीय अनुराधाताई चव्हाण राजगुरू साहेब तसेच राजेंद्र जंजाळ साहेब तसेच माननीय सर्व पदाधिकारी व आयुक्त साहेब तसेच सर्व भागातील प्रभागातील झोनल व प्रभा ग अधिकारी तसेच नगरसेवक हे सगळ्यांनी उपस्थित होते व कामगारांना गाड्या सोपवण्यात करण्यात आला व गाड्या वाटप करण्यात आले व आज कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या हक्कासाठी व नवीन कामगारांना संधी देणे देण्यात आली तसेच महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी जेसीबी टिप्पर 407 व टाटा एसी व टाटा एसी ev छत्रपती संभाजी नगर मधील प्रभागांमध्ये रूट मॅप सहित नागरिकांना सेवेसाठी देण्यात आले तसेच4
- *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००1
- नाशिक:सरकारवाडा पोलिस ठाण्यातील विनयभंग व महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यात आज (१ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती; मात्र आवश्यक मुद्देमाल जप्त झाल्याने न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. खरातविरुद्ध आतापर्यंत १९ गुन्हे नोंद असून तो ४४ दिवस पोलिस कोठडीत होता.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Post by Devidas Bhusare2