logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक सिंहस्थ २०२७ : गोदावरीकाठी १२ नवीन घाट उभारणी; नाशिक-त्र्यंबकेश्वरात स्नानक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठावर १२ नवीन घाट उभारण्यात येत असून, भाविकांसाठी उपलब्ध होणारी स्नान व धार्मिक विधींची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून ही कामे सुरू असून, कुंभमेळ्यापूर्वी ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नाशिक शहरातील घाटांची संख्या सध्या असलेल्या १० घाटांवरून २० पर्यंत वाढविण्यात येणार असून, सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या गोदावरी किनाऱ्यावर ही विस्तारयोजना राबवली जात आहे. कपिला संगम घाट, नंदिनी संगम घाट, टाकळी संगम ब्रिज घाट, टाकळी संगम घाट, नांदूर दसक डावा काठ, नांदूर दसक उजवा काठ, ओढा घाट, सोमेश्वर धबधबा घाट, नवश्या गणपती घाट आणि लक्ष्मीनारायण घाट या १० नवीन घाटांमुळे एकूण ३,४५१ मीटर नवीन घाट लांबीची भर पडणार असून, यासाठी अंदाजे ३६१.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या डाव्या व उजव्या काठावर प्रत्येकी एक असे दोन नवीन घाट उभारले जात असून, एकूण ३,१४० मीटर लांबीची वाढ होणार आहे. जलसंपदा विभागामार्फत सुमारे १४६.१० कोटी रुपये खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली असून, मार्च २०२७ पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर घाटांची रचना करताना गर्दी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक घाटासाठी निश्चित क्षमता, पोलिस चौक्या, वॉचटॉवर्स, स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, आपत्कालीन सेवा मार्ग आणि पार्किंगशी जोडणी यांचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय वस्रांतरगृहे , स्वच्छतागृहे आणि प्रकाशव्यवस्था ही मूलभूत सुविधा म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व घाटांसाठी एकसंध नामांकन आणि सीमांकन प्रणाली विकसित केली जात असून, कुंभमेळ्यादरम्यान विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे. अमृत स्नानाच्या दिवशी एकाच वेळी लाखो भाविक स्नानासाठी एकत्र येतात. अशा वेळी सुस्थित आणि स्पष्टपणे व्यवस्थापित घाटक्षेत्र ही सुरक्षिततेची मूलभूत गरज ठरते. “घाट हेच सिंहस्थाचे केंद्रबिंदू आहेत. रस्ते, पार्किंग, आरोग्य सुविधा यांसारखी इतर सर्व पायाभूत व्यवस्था भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्यांचे आधुनिकीकरण करून सिंहस्थ २०२७च्या प्रमाणाला साजेशी व्यवस्था उभारण्यात येत आहे,” असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. चौकट नाशिक : १० नवीन घाट | वाढीव लांबी – ३,४५१ मीटर | खर्च – ३६१.२६ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर : २ नवीन घाट | वाढीव लांबी – ३,१४० मीटर | खर्च – १४६.१० कोटी रुपये एकूण नवीन घाट लांबी : ६,५९१ मीटर चौकट प्रस्तावित घाट – नाशिक १. कपिला संगम घाट — ४०० मीटर २. नंदिनी संगम घाट — २७५ मीटर ३. टाकळी संगम ब्रिज घाट — ४०० मीटर ४. टाकळी संगम घाट — ३०० मीटर ५. नांदूर दसक डावा काठ — ५०० मीटर ६. नांदूर दसक उजवा काठ — ५७० मीटर ७. ओढा घाट — २५५ मीटर ८. सोमेश्वर धबधबा घाट — १७४ मीटर ९. नवश्या गणपती घाट — १६७ मीटर १०. लक्ष्मीनारायण घाट — ४१० मीटर एकूण : ३,४५१ मीटर प्रस्तावित घाट – त्र्यंबकेश्वर १. डावा काठ — १,६१४ मीटर २. उजवा काठ — १,५२६ मीटर एकूण : ३,१४० मीटर

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
be45a5df-b802-4ab6-af33-7f2dee6324ee

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...
    1
    Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* ​ *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;* ​चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. ​तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.
    4
    *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* 
​ *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;*
​चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.
दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
​तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे.
निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.
    1
    वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात 
A/C त बसून जनतेची सेवा करताना.
    user_SU NEWS 📡
    SU NEWS 📡
    Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • टॉवर पर चढ़ी युवती, प्रेमी से शादी की जिद में हाई-वोल्टेज ड्रामा न्यूज़: उत्तर प्रदेश के कुंडा के फरेंदुपुर गांव में उस समय हड़कंप मच गया जब एक युवती मोबाइल टॉवर पर चढ़ गई। बताया जा रहा है कि युवती अपने प्रेमी से शादी करने की मांग को लेकर टॉवर पर चढ़कर विरोध करने लगी। सूचना मिलने पर पुलिस मौके पर पहुंची और काफी मशक्कत के बाद युवती को सुरक्षित नीचे उतारा। घटना के दौरान मौके पर बड़ी संख्या में ग्रामीणों की भीड़ जमा हो गई। #UttarPradesh #Kunda #LoveDrama #ViralNews #MobileTower UPNews TrendingNews IndiaNew
    1
    टॉवर पर चढ़ी युवती, प्रेमी से शादी की जिद में हाई-वोल्टेज ड्रामा
न्यूज़:
उत्तर प्रदेश के कुंडा के फरेंदुपुर गांव में उस समय हड़कंप मच गया जब एक युवती मोबाइल टॉवर पर चढ़ गई। बताया जा रहा है कि युवती अपने प्रेमी से शादी करने की मांग को लेकर टॉवर पर चढ़कर विरोध करने लगी। सूचना मिलने पर पुलिस मौके पर पहुंची और काफी मशक्कत के बाद युवती को सुरक्षित नीचे उतारा। घटना के दौरान मौके पर बड़ी संख्या में ग्रामीणों की भीड़ जमा हो गई।
#UttarPradesh #Kunda #LoveDrama #ViralNews #MobileTower UPNews TrendingNews IndiaNew
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जावेद हैदर ने दिव्यांगें के लिए लाया सुनेरा अवसर मिलेगा लाभ BNN NEWS
    1
    जावेद हैदर ने दिव्यांगें के लिए लाया सुनेरा अवसर मिलेगा लाभ BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भारत सरकार सेवार्थ
    1
    भारत सरकार सेवार्थ
    user_जिला न्यायालय पालघर
    जिला न्यायालय पालघर
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सीएम नीतीश कुमार के इस्तीफ़ा देने के बाद फूट-फूट कर रोने लगे मंत्री अशोक चौधरी !!
    1
    सीएम नीतीश कुमार के इस्तीफ़ा देने के बाद फूट-फूट कर रोने लगे मंत्री अशोक चौधरी !!
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.