जनतेला ‘त्याग’ करण्याचा उपदेश करण्यापेक्षा नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे' : हर्षवर्धन सपकाळ. मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का ? असा संतप्त प्रश्न विचारून, प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना हे महाशय टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

- Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin! Atul Londhe Questions PM Modi Over Petroleum Crisis | 300 Car Rally Sends Big Message | Wah Jawab Nahin! Congress leader Atul Londhe strongly questioned PM Modi and the Central Government over the rising petroleum crisis and fuel-related issues. A massive 300-car rally was organized to raise public awareness and send a strong political message. Why is the government silent on petroleum prices and fuel concerns? Watch the full report and public reaction in this special coverage. 📍 Massive Car Rally 📍 Petroleum Crisis Debate 📍 Political Reactions 📍 Public Anger Over Fuel Issues Stay connected with INDDIV for the latest political updates, ground reports, and breaking news from Maharashtra and across India. #AtulLondhe #PMModi #PetroleumCrisis #FuelPriceHike #300CarRally #PoliticalNews #BreakingNews #INDDIV #PetrolDieselPrice #ModiGovernment #Congress #MaharashtraNews #IndiaNews #ViralNews #YouTubeShorts1
- विजयच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री त्रिशाची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तिच्या अचानक आलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.1
- पश्चिम भांडुप, मुंबई येथे नगरसेविका जागृती पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने पालिका वनक्षेत्रातील गांजाची शेती उद्ध्वस्त केली. जंगली डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा चिंतेतून ही लागवड उघडकीस आली, ज्यात दाट जंगलात ड्रग्जच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सर्व गांजाची झाडे जप्त करून नशेखोरांचे अड्डे पाडण्यात आले, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित झाली.1
- मुंबई उपनगरमधील अंधेरी परिसरात एका रिकाम्या प्लॉटमध्ये मातीच्या आत एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतक गोविंद मूळचा मध्य प्रदेशचा असून, तो आपल्या मामासोबत येथे राहत होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून ही हत्या आहे की आणखी काही, याचा तपास सुरू केला आहे.1
- एक नवी कविता 'BHADVA RANI' समोर आली आहे. या कवितेने मुंबईत लक्ष वेधले असून ती चर्चेचा विषय ठरत आहे.1
- मुंबईच्या माळात एका शाळेत ७०० हून अधिक लोकांचे कथितरित्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. हिंदू कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच, त्यांनी विरोध केला आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.1
- मुंबईच्या विनोबा भावे नगर परिसरातील गरीब नवाज इमारतीजवळ रेशनिंग विभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे अन्नधान्याच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.1
- मुंबईतील दहिसर पूर्व येथे मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते रायगड सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना आता नव्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.1