"कर्करोग शिबिराला उत्तम प्रतिसाद - ६० च्यावर पत्रकारांची आरोग्यतपासणी- "कर्करोग शिबिराला उत्तम प्रतिसाद - ६० च्यावर पत्रकारांची आरोग्यतपासणी- नागपूर दि. १० (प्रतिनिधी)- देशात कर्क रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वाढीला अंकुश लावण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे असे आश्वासन नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज रोगनिदान आरोग्य शिबिरात पत्रकारांना दिले. प्रेस क्लब नागपूर च्यावतीने आज पत्रकार व त्यांच्या कुटुंबाकरीता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. नागपुरातील नामांकित रुग्णालयांशी संपर्क साधून एक मोठे आरोग्य शिबीर पत्रकारांसाठी आयोजित करू. त्यासाठी मी पुढाकार घेईन असेही ते म्हणाले. कॅन्सर से जंग जीतेंगे हम पत्रकारों के संग या टँग लाईन अंतर्गत नागपूर प्रेस क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे 60 पत्रकारांनी शिबिरात भाग घेतला. अन् विविध चाचण्या करून घेतल्या. यावेळी पत्रकारांनी रक्तदान केले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली गेली. मुख कर्करोग, स्तन कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, आणि श्वसन संदर्भात कर्करोगाची तपासणी केली. तसेच दंत, नेत्र, हाड मजबूती व स्त्रीरोग तपासणी केली. कर्करोगाप्रती जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, या सोबतच शिबिर संयोजक अब्दुल गफूर पाशा तथा कॅन्सर केअर फाउंडेशनचे शाकिर रजा खान, डॉ. प्रशांत ढोके, भूपेंद्र गणवीर, महेश उपदेव, विवेक पुराडभट, चंद्रकांत शेंडे, रणजीत देशमुख, शामकांत पात्रीकर, मंगेश व्यवहारे, लोकमतचे जितेंद्र ढवळे यांच्यासह इतरही पत्रकारांची उपस्थिती होती.

- महाराणा प्रताप रैली पर पथराव ! हापुड़ में शोभायात्रा के दौरान बवाल उत्तर प्रदेश के हापुड़ में महाराणा प्रताप जयंती शोभायात्रा के दौरान उस समय तनाव फैल गया, जब मुस्लिम बहुल इलाके में कथित तौर पर पत्थरबाजी की घटनाएं सामने आईं। घटना में कई लोग घायल हुए हैं, जबकि कई वाहनों में भी तोड़फोड़ और नुकसान की खबर है। मौके पर भारी पुलिस बल तैनात कर दिया गया है और पूरे मामले की जांच जारी है। इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है ताकि स्थिति को नियंत्रित रखा जा सके।1
- मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.2
- महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर विधानसभा क्षेत्रे ही योजना राबवणारे राज्यातील पहिले ठरले आहेत.1
- नागपुरात अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यात जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी घोषित करण्यावर सखोल चर्चा झाली, तसेच संघटना बळकट करण्यावर भर दिला गेला. प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुल्तानी यांनी मुस्लिम समाजासाठी एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन केले.1
- नागपुरात एका मुलाने आपल्या वडिलांना यकृताचा भाग दान करून त्यांचे प्राण वाचवले. या हृदयस्पर्शी कृतीने पित्याला नवजीवन मिळाले असून, मुलाच्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.1
- नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे नवीन पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर विदेशी सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला. क्राईम ब्रांचच्या 'ऑपरेशन थंडर'ने ही कारवाई केली असून, यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- उत्तर नागपुरातील आटोमैटीव चौकात सुसाट वाऱ्याने एका मोठ्या जाहिरात फलकाचे तुकडे झाले. धुळीच्या वादळासह आलेल्या सुमारे ३५ मिनिटांच्या वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक दुकानदारांचेही मोठे नुकसान केले.1