कास्ट्राईब पदाधिकाऱ्यांच्या लातूर जिल्ह्यात विविध अधिकाऱ्यांशी भेटी कास्ट्राईब पदाधिकाऱ्यांच्या लातूर जिल्ह्यात विविध अधिकाऱ्यांशी भेटी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा लातूर : कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मा. शिवाजी बिबराळे (मंत्रालयीन सचिव, कास्ट्राईब), डॉ. शरद कांबळे (जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना, लातूर), सत्यवान कुलबर्गी (जिल्हाध्यक्ष, दिव्यांग विभाग, लातूर), मा. भीमाशंकर जाभाडे, हुजूर देशमुख व माधव कांबळे यांनी लातूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पुढील कार्यालयांमध्ये भेटी देण्यात आल्या— १) मा. जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर २) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर ३) मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर ४) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक, लातूर ५) मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, लातूर तसेच मा. भारत कांबळे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, लातूर तसेच मा. राजीव गायकवाड( सहाय्यक सल्लागार ) दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, लातूर यांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद लातूरचे समाजकल्याण सभापती मा. उत्तम माने यांची सदिच्छा भेट घेऊन विविध सामाजिक, शैक्षणिक व कर्मचारीविषयक बाबींवर चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याचबरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटना, लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. शरद कांबळे यांनी संबंधित कार्यालयात नियुक्ती आदेश सुपूर्द करून संघटनात्मक जबाबदारीची प्रक्रिया पूर्ण केली. संघटनेची जिल्ह्यातील बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच शिक्षक, कर्मचारी व दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कास्ट्राईब संघटना सदैव तत्पर असून, संघटनात्मक बांधणी आणि प्रश्नांच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.

- जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद जि प भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज (दि १७) स्वयंशिस्त उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजनाचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला1
- आप नागपूर नवीन कार्यकारिणी जाहीर: डॉ. अमेयक नरनवरे यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा!"1
- नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान1
- वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1
- भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- वर्धा ट्राफिक टीम आर्वी दाखल 18 वयापेक्षा कमी गाडी चालवणारे यांना चालन1
- मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1