तिरुपती देवस्थान साठी लाईफ फाउंडेशन कडून 25 ई बस प्रदान: मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते भाविकार्पण अनंत अंबानींचे वचन पूर्ण; रिलायन्स फाउंडेशनकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस ब्रह्मोत्सवाच्या काळात नव्या बस दाखल; स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही सज्ज तिरुमला- श्रध्देय बालाजी दर्शना साठी तिरुमलाला येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशनने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे २५ इलेक्ट्रिक बस सुपूर्द केल्या आहेत. या बससाठी स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या बसांना हिरवा झेंडा दाखवला. नव्या इलेक्ट्रिक बसांमुळे दरवर्षी तिरुमलाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल. तिरुमलामध्ये ब्रह्मोत्सवाचा उत्सव सुरू असून, यावेळी मोठ्या संख्येने भाविक तिरुमलाला येत असताना या बस सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जून २०२६ मध्ये तिरुमला दौऱ्यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस देण्याचे वचन दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत रिलायन्स फाउंडेशनने हे वचन पूर्ण केले आहे. या बससाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी Jio-bp ने तांत्रिक सहकार्य केले आहे. अनंत अंबानी म्हणाले, “दरवर्षी लाखो भाविक भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तिरुमलाला येतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी योगदान देणे हे आमच्यासाठी सौभाग्य आणि जबाबदारी दोन्ही आहे. या २५ इलेक्ट्रिक बस तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रयत्नांना आमचे छोटेसे योगदान आहे. तिरुमलेश्वराच्या तीर्थयात्रेचा अनुभव अधिक आरामदायी करण्यासोबतच या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे, हा यामागचा उद्देश आहे.” या बसमुळे भाविकांची मोठी सोय होणार असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे .
तिरुपती देवस्थान साठी लाईफ फाउंडेशन कडून 25 ई बस प्रदान: मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते भाविकार्पण अनंत अंबानींचे वचन पूर्ण; रिलायन्स फाउंडेशनकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस ब्रह्मोत्सवाच्या काळात नव्या बस दाखल; स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही सज्ज तिरुमला- श्रध्देय बालाजी दर्शना साठी तिरुमलाला येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशनने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे २५ इलेक्ट्रिक बस सुपूर्द केल्या आहेत. या बससाठी स्वतंत्र ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या बसांना हिरवा झेंडा दाखवला. नव्या इलेक्ट्रिक बसांमुळे दरवर्षी तिरुमलाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल. तिरुमलामध्ये ब्रह्मोत्सवाचा उत्सव सुरू असून, यावेळी
मोठ्या संख्येने भाविक तिरुमलाला येत असताना या बस सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जून २०२६ मध्ये तिरुमला दौऱ्यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमला २५ इलेक्ट्रिक बस देण्याचे वचन दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत रिलायन्स फाउंडेशनने हे वचन पूर्ण केले आहे. या बससाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी Jio-bp ने तांत्रिक सहकार्य केले आहे. अनंत अंबानी म्हणाले, “दरवर्षी लाखो भाविक भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तिरुमलाला येतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी योगदान देणे हे आमच्यासाठी सौभाग्य आणि जबाबदारी दोन्ही आहे. या २५ इलेक्ट्रिक बस तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रयत्नांना आमचे छोटेसे योगदान आहे. तिरुमलेश्वराच्या तीर्थयात्रेचा अनुभव अधिक आरामदायी करण्यासोबतच या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे, हा यामागचा उद्देश आहे.” या बसमुळे भाविकांची मोठी सोय होणार असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे .
- शेकडो शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ विरोध केला..... शेकडो शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ महामार्ग लादणाऱ्या प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध केला जनसंवाद दरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांच्या मध्ये तणाव एकच जिद्द शक्तिपीठ कडेगाव प्रांताधिकारी कार्यालय दणाणून गेले शेतकऱ्यांना हलक्यात घ्याल तर मातीत जाल कडेगाव प्रांताधिकारी महामार्ग विभागाचे अधिकारी ,पलूस तहसीलदार, मोणार्क कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती च्या वतीने एक सुरात शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड : खेडचे भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने खेडेकर यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.1
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- परभणीत घुमणार पिवळ वादळ.मोर्चास उपस्थित राहावे विद्याताई मोठे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी मायबाप युवक-युवती वतीने दि. 17 सप्टेंबर रोजी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व दीपक भाऊ बोराडे करणार असल्याची माहिती साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका व धनगर समाजाची रणरागिणी सौ. विद्याताई सचिन मोठे यांनी समाज बांधवांना एकजुटीचे आवाहन केले. विद्याताई मोठे म्हणाल्या, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मुला-बाळाच्या भविष्यासाठी आता गप्प बसून चालणार नाही. आपला आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर बांधवाने 17 सप्टेंबरला परभणीत मोठ्या संख्येने व शांततेने उपस्थित राहावे.1