जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेत दिल्या सुचना हिंगोली दि. 25 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सन 2026-27 मधील 18 प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली. या सर्व प्रकरणांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेत याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे, पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गुट्टे यांनी बैठकीत विविध प्रकरणांची तपशीलवार माहिती सादर केली.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेत दिल्या सुचना हिंगोली दि. 25 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सन 2026-27 मधील 18 प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली. या सर्व प्रकरणांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेत याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे, पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गुट्टे यांनी बैठकीत विविध प्रकरणांची तपशीलवार माहिती सादर केली.
- *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.2
- मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.1
- 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes1
- हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.4
- 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना, दि. २५ ऑगस्ट : जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय तरुणाला गांजा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा, किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अवैध गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना सुरज सदाशिव हादगुले (वय २४, रा. महेबुबनगर, अंबड, जि. जालना) हा गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नुरशहावली दर्गा रोड, बसस्थानक परिसर, जालना येथे कारवाई करून सुरज हादगुले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून पुढील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाने, प्रदीप करतारे, गणपत पवार व सुनील पवार यांनी केली.2
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- धनगर समाज शांत आहे मात्र त्याचा तिसरा डोळा देखील आहे - दीपक बोराडे धनगर समाज शांत आहे मात्र त्याचा तिसरा डोळा देखील आहे - दीपक बोराडे1
- नांदेड : वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.1
- 🚨 Nanded Crime | लोहा तालुक्यात २ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप; चॉकलेटचे आमिष दाखवणारा चुलत काका अटकेत 📍नांदेड | २५ ऑगस्ट २०२६ नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिमुकलीच्या चुलत काकावर, विलास वाघमारे याच्यावर आरोप असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या चुलत काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला सोबत नेल्याचा आरोप आहे. सुमारे २० ते २५ मिनिटांनंतर तो चिमुकलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. घरी आल्यानंतर चिमुकली रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर विचारपूस केल्यानंतर घटना समोर आल्याचे वृत्त आहे. चिमुकलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकांनी तिला नांदेड येथील शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सोनखेड पोलिसांनी विलास वाघमारे याच्याविरुद्ध POCSO कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. 📍नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा. #NandedCrime #NandedNews #Loha #Sonkhed #NandedPolice #POCSO #CrimeNews #NandedUpdates #MaharashtraNews #NandigramTimes1