लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेच्या पोलीस सभासदांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हेल्मेट वाटप. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेच्या पोलीस सभासदांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हेल्मेट वाटप. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, व चार चाकी स्वारासाठी सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदार दुचाकी वाहन चालविणाऱ्यांना हेल्मेट व चार चाकी वाहन चालवणारा सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. लातूर पोलिसांच्या लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांनी लातूर पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा यासाठी पतसंस्थेचे सभासदांना हेल्मेट वाटप करण्याचा मानस पोलीस अधीक्षक यांना दाखविला. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या संमतीने लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेतील ठेवीदार व आर.डी. धारक सभासदांना मोफत आयएसआय (ISI) प्रमाणित हेल्मेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात सभासदांना हेल्मेट वाटप कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात 50 पोलीस अंमलदार/संस्थेचे सभासद ठेवीदार यांना हेल्मेट चे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले असून आणखीन दीड हजार पोलिसांना पतसंस्थेकडून हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सदर कार्यक्रमादरम्यान सांगितले की, "उपलब्ध आकडेवारीनुसार, रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 80 टक्के मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होतात. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट हे डोक्याचे व मेंदूचे संरक्षण करणारे अत्यावश्यक साधन आहे. अपघाताच्या वेळी होणारा जोरदार आघात हेल्मेट शोषून घेत असल्यामुळे गंभीर दुखापती टाळल्या जातात आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. त्यामुळे हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले." पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले फ्रंटलाइन यंत्रणा असून, अनेकदा ड्युटीच्या धावपळीत स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळते. अनियमित कामाचे तास, ताणतणाव व सततची हालचाल यामुळे पोलीस कर्मचारीही अपघाताच्या जोखमीला सामोरे जातात. अशा घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वतःपासून सुरुवात करून सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे, सचिव नामदेव सारोळे, गोविंद सरवदे, खुर्रम काझी माधव, माधव केंद्रे, आयुब शेख, नवनाथ कल्याने, श्रीमती दीपिका शिवलकर व अनुराधा मेहकर तसेच सभासद मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना नियमित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. पतसंस्थेकडून पोलिसांच्या सुरक्षितेसाठी मोफत हेल्मेट वाटप करण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक पोलीस अधिकारी व अमलदारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे हा आहे. “हेल्मेट ही आपत्ती नसून जीवाची ढाल आहे” हा संदेश देत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. लातूर पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ पोलीस कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेच्या पोलीस सभासदांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हेल्मेट वाटप. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेच्या पोलीस सभासदांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हेल्मेट वाटप. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, व चार चाकी स्वारासाठी सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदार दुचाकी वाहन चालविणाऱ्यांना हेल्मेट व चार चाकी वाहन चालवणारा सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. लातूर पोलिसांच्या लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांनी लातूर पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा यासाठी पतसंस्थेचे सभासदांना हेल्मेट वाटप करण्याचा मानस पोलीस अधीक्षक यांना दाखविला. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या संमतीने लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेतील ठेवीदार व आर.डी. धारक सभासदांना मोफत आयएसआय (ISI) प्रमाणित हेल्मेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात सभासदांना हेल्मेट वाटप कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात 50 पोलीस अंमलदार/संस्थेचे सभासद ठेवीदार यांना हेल्मेट चे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले असून आणखीन दीड हजार पोलिसांना पतसंस्थेकडून हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सदर कार्यक्रमादरम्यान सांगितले की, "उपलब्ध आकडेवारीनुसार, रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 80
टक्के मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होतात. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट हे डोक्याचे व मेंदूचे संरक्षण करणारे अत्यावश्यक साधन आहे. अपघाताच्या वेळी होणारा जोरदार आघात हेल्मेट शोषून घेत असल्यामुळे गंभीर दुखापती टाळल्या जातात आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. त्यामुळे हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले." पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले फ्रंटलाइन यंत्रणा असून, अनेकदा ड्युटीच्या धावपळीत स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळते. अनियमित कामाचे तास, ताणतणाव व सततची हालचाल यामुळे पोलीस कर्मचारीही अपघाताच्या जोखमीला सामोरे जातात. अशा घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वतःपासून सुरुवात करून सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे, सचिव नामदेव सारोळे, गोविंद सरवदे, खुर्रम काझी माधव, माधव केंद्रे, आयुब शेख, नवनाथ कल्याने, श्रीमती दीपिका शिवलकर व अनुराधा मेहकर तसेच सभासद मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना नियमित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. पतसंस्थेकडून पोलिसांच्या सुरक्षितेसाठी मोफत हेल्मेट वाटप करण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक पोलीस अधिकारी व अमलदारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे हा आहे. “हेल्मेट ही आपत्ती नसून जीवाची ढाल आहे” हा संदेश देत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. लातूर पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ पोलीस कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- Post by Karan1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1