logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

4 hrs ago
user_Prasad Panchal
Prasad Panchal
पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
4 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रेस नोट शंभूराजे राज्याभिषेक दिनी किल्ले पुरंदर येथून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराची भव्य सुरुवात विक्रम शिंदे /भोर दि.17 छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर येथे शंभूराजे राज्याभिषेक दिनानिमित्त आज संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. स्वराज्य, त्याग, संघर्ष आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून प्रचाराची सुरुवात करून, जनतेसाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि संघर्षशील राजकारण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शंभूराजेंच्या विचारांना अभिवादन करत, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर म्हणाले की, “शंभूराजेंच्या जन्मभूमीवरून प्रचाराची सुरुवात करणे हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, भोरच्या मातीशी निष्ठा राखत जनतेसाठी प्रामाणिक, संघर्षशील आणि जबाबदार राजकारण करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.” या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री. संतोष शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर, पुणे शहराध्यक्ष शिवश्री. अविनाशजी मोहिते, तसेच ज्योतिबा नरवडे, संतोष शिंदे, सागर शिंदे, दादासाहेब शेलार, प्रशांत मोहिते, अविनाश मोहिते, नामदेव सावंत, शिवश्री. दिपक शिंदे, ऋषी कापडी, तेजस मेटे, हेमंत चौधरी, प्रितम कोंढाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचाराच्या माध्यमातून भोर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून जनतेशी थेट संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
    1
    प्रेस नोट
शंभूराजे राज्याभिषेक दिनी किल्ले पुरंदर येथून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराची भव्य सुरुवात
विक्रम शिंदे /भोर दि.17
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर येथे शंभूराजे राज्याभिषेक दिनानिमित्त आज संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
स्वराज्य, त्याग, संघर्ष आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून प्रचाराची सुरुवात करून, जनतेसाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि संघर्षशील राजकारण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शंभूराजेंच्या विचारांना अभिवादन करत, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर म्हणाले की,
“शंभूराजेंच्या जन्मभूमीवरून प्रचाराची सुरुवात करणे हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, भोरच्या मातीशी निष्ठा राखत जनतेसाठी प्रामाणिक, संघर्षशील आणि जबाबदार राजकारण करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.”
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री. संतोष शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर, पुणे शहराध्यक्ष शिवश्री. अविनाशजी मोहिते, तसेच ज्योतिबा नरवडे, संतोष शिंदे, सागर शिंदे, दादासाहेब शेलार, प्रशांत मोहिते, अविनाश मोहिते, नामदेव सावंत, शिवश्री. दिपक शिंदे, ऋषी कापडी, तेजस मेटे, हेमंत चौधरी, प्रितम कोंढाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचाराच्या माध्यमातून भोर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून जनतेशी थेट संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बालेपीर प्रभाग क्रमांक 11 मध्ये नगरसेवक ॲक्शन मोडवर ; स्वच्छता कामांना सुरुवात
    1
    बालेपीर प्रभाग क्रमांक 11 मध्ये नगरसेवक ॲक्शन मोडवर ; स्वच्छता कामांना सुरुवात
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    Journalist Beed, Maharashtra•
    1 hr ago
  • संत निवृत्तीनाथ महाराज यांचे यात्रे साठी काजी सांगवी ते त्र्यंबकेश्वर पायी निघालेले यात्रेकरू त्यांचे स्वागत करतांना पुरुषोत्तम पार्क व श्रीराम रो-हाऊस येथील भाविक*🚩🚩🚩 *पायी दिंडी सोहळा संपन्न* 🙏🏻
    1
    संत निवृत्तीनाथ महाराज यांचे यात्रे साठी काजी सांगवी ते त्र्यंबकेश्वर पायी निघालेले यात्रेकरू त्यांचे  स्वागत करतांना पुरुषोत्तम पार्क व श्रीराम रो-हाऊस येथील भाविक*🚩🚩🚩 *पायी दिंडी सोहळा संपन्न* 🙏🏻
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    4 hrs ago
  • Post by User9650
    2
    Post by User9650
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Sameer Sheikh
    1
    Post by Sameer Sheikh
    user_Sameer Sheikh
    Sameer Sheikh
    Khuldabad, Aurangabad•
    4 hrs ago
  • *बीडमध्ये माणुसकीला काळिमा! संक्रांतीच्या दिवशीच धनगर मेंढपाळांना अमानुष मारहाण* मकर संक्रांतीचा सण सर्वत्र गोडवा वाटून साजरा होत असताना, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे एक अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मेंढ्या चारून उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर समाजाच्या बांधवांना स्थानिक समाजकंटकांनी जातिवाचक शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला आणि वृद्धांनाही लक्ष्य करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी मातोरी शिवारात धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत होते. यावेळी मेंढ्या शेतात शिरल्याच्या कारणावरून स्थानिक काही व्यक्तींनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी मेंढपाळांच्या जातीचा उल्लेख करून त्यांना अत्यंत खालच्या थराची वागणूक दिली. ​केवळ शब्दांवर न थांबता, समाजकंटकांनी संघटित होऊन मेंढपाळ कुटुंबावर हल्ला चढवला. या भ्याड हल्ल्यात लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला असून, कुटुंबातील पुरुष, महिला आणि वृद्धांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मेंढ्यांचेही नुकसान झाले आहे. ​पोलिसांत धाव आणि अटकेची मागणी ​या घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर 'ॲट्रॉसिटी' आणि 'खुनी हल्ल्याचा प्रयत्न' केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी धनगर समाजातील विविध संघटनांनी केली आहे. "सणासुदीच्या दिवशी अशा प्रकारे कष्टकरी समाजावर हल्ला होणे ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब नाही," अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ​तीव्र आंदोलनाचा इशारा ​घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. जर आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणात कडक पावले उचलून मेंढपाळ समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ​"मेंढपाळ समाज हा नेहमीच भटकंती करून आपला उदरनिर्वाह करतो. अशा कष्टकरी लोकांशी जातीवरून भेदभाव करणे आणि त्यांना मारहाण करणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे." ​
    1
    *बीडमध्ये माणुसकीला काळिमा! संक्रांतीच्या दिवशीच धनगर मेंढपाळांना अमानुष मारहाण*
मकर संक्रांतीचा सण सर्वत्र गोडवा वाटून साजरा होत असताना, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे एक अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मेंढ्या चारून उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर समाजाच्या बांधवांना स्थानिक समाजकंटकांनी जातिवाचक शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला आणि वृद्धांनाही लक्ष्य करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी मातोरी शिवारात धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत होते. यावेळी मेंढ्या शेतात शिरल्याच्या कारणावरून स्थानिक काही व्यक्तींनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी मेंढपाळांच्या जातीचा उल्लेख करून त्यांना अत्यंत खालच्या थराची वागणूक दिली.
​केवळ शब्दांवर न थांबता, समाजकंटकांनी संघटित होऊन मेंढपाळ कुटुंबावर हल्ला चढवला. या भ्याड हल्ल्यात लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला असून, कुटुंबातील पुरुष, महिला आणि वृद्धांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मेंढ्यांचेही नुकसान झाले आहे.
​पोलिसांत धाव आणि अटकेची मागणी
​या घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर 'ॲट्रॉसिटी' आणि 'खुनी हल्ल्याचा प्रयत्न' केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी धनगर समाजातील विविध संघटनांनी केली आहे. "सणासुदीच्या दिवशी अशा प्रकारे कष्टकरी समाजावर हल्ला होणे ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब नाही," अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
​तीव्र आंदोलनाचा इशारा
​घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. जर आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणात कडक पावले उचलून मेंढपाळ समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
​"मेंढपाळ समाज हा नेहमीच भटकंती करून आपला उदरनिर्वाह करतो. अशा कष्टकरी लोकांशी जातीवरून भेदभाव करणे आणि त्यांना मारहाण करणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे."
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by SUNIL ANNA SONAWANE
    1
    Post by SUNIL ANNA SONAWANE
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    4 hrs ago
  • *छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी येथे आज सकाळी घडलेल्या आगीच्या भीषण घटना* वाळूज एमआयडीसीत आगीचे तांडव: 'सुप्रीम सिलिकॉन' खाक; ५ कोटींची राख रांगोळी वाळूज औद्योगिक वसाहतीतील (MIDC) वातावरण आज सकाळी आगीच्या भडक्याने हादरून गेले. येथील प्रसिद्ध 'सुप्रीम सिलिकॉन' कंपनीच्या प्लांट क्रमांक ५५ ला लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, कंपनीचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. ​नेमकी घटना काय? ​आज शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास जेव्हा रात्रपाळी संपून सकाळच्या शिफ्टची लगबग सुरू होती, तेव्हा ही दुर्घटना घडली. कंपनीच्या मुख्य मशिनरी विभागातून अचानक काळा धूर बाहेर येऊ लागला. पाहता पाहता, सिलिकॉन ऑइल आणि रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण प्लांट आगीच्या विळख्यात सापडला. ​अग्निशमन दलाची ३ तासांची झुंज ​घटनेची माहिती मिळताच ७:१५ वाजेपर्यंत महापालिका आणि एमआयडीसीचे ५ ते ६ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, उष्णतेमुळे कंपनीचे लोखंडी स्ट्रक्चर आणि छत वाकून गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत ही आग शेजारील इतर कंपन्यांमध्ये पसरण्यापासून रोखली. तब्बल ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली.
    1
    *छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी येथे आज सकाळी घडलेल्या आगीच्या भीषण घटना*
वाळूज एमआयडीसीत आगीचे तांडव: 'सुप्रीम सिलिकॉन' खाक; ५ कोटींची राख रांगोळी
वाळूज औद्योगिक वसाहतीतील (MIDC) वातावरण आज सकाळी आगीच्या भडक्याने हादरून गेले. येथील प्रसिद्ध 'सुप्रीम सिलिकॉन' कंपनीच्या प्लांट क्रमांक ५५ ला लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, कंपनीचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
​नेमकी घटना काय?
​आज शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास जेव्हा रात्रपाळी संपून सकाळच्या शिफ्टची लगबग सुरू होती, तेव्हा ही दुर्घटना घडली. कंपनीच्या मुख्य मशिनरी विभागातून अचानक काळा धूर बाहेर येऊ लागला. पाहता पाहता, सिलिकॉन ऑइल आणि रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण प्लांट आगीच्या विळख्यात सापडला.
​अग्निशमन दलाची ३ तासांची झुंज
​घटनेची माहिती मिळताच ७:१५ वाजेपर्यंत महापालिका आणि एमआयडीसीचे ५ ते ६ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, उष्णतेमुळे कंपनीचे लोखंडी स्ट्रक्चर आणि छत वाकून गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत ही आग शेजारील इतर कंपन्यांमध्ये पसरण्यापासून रोखली. तब्बल ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 🔥💥KING MAKER 💥🔥Nandkumar Ghodele #politics #shortvideo #edit
    1
    🔥💥KING MAKER 💥🔥Nandkumar Ghodele #politics #shortvideo #edit
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.