बोरामणीत ‘समाधान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिक लाभार्थी दक्षिण सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बोरामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत ‘समाधान’ शिबिर आयोजित करण्यात आले होते. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराचा शेकडो नागरिकांनी एकाच दिवशी लाभ घेतला. सदर अभियानाचे उद्घाटन बोरामणी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य नेताजीभाऊ खंडागळे व पंचायत समिती सदस्य विजय उमाकांत राठोड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी बोरामणीच्या सरपंच अरुणा साळुंखे,धनेश अचलारे, सोमनाथ पटणे,सिद्धाराम हेले, अनिता माळगे, ग्रामपंचायत सदस्य, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच बोरामणी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित या शिबिरात प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे दाखले, विविध प्रमाणपत्रे, निराधार योजना, घरकुल बांधकामासाठी वाळू पावत्यांचे वितरण, नवीन बिनशेती (एन.ए.) सुधारणा आदी विविध कामे महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, पोलीस विभाग, महावितरण, महापारेषण, ग्रामविकास विभाग तसेच आरोग्य विभाग आदी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिरात सहभागी नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली. यावेळी दक्षिण सोलापूरचे प्रांताधिकारी सुमित शिंदे तसेच तहसीलदार किरण जमदाडे यांनी शिबिरास भेट देऊन पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या आपल्या रयतेची काळजी घेणाऱ्या महापुरुषाच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ‘समाधान’ शिबिराचे तहसील कार्यालयाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले होते. शिबिरात सहभागी प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते. या शिबिरासाठी बोरामणी गटातील सर्व गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- Post by Vijay Meher1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतीथी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज मोठ्या भक्तीभावाने सुरूवात करण्यात आली. या धर्मसंकीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प आज नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका मीरा कुलकर्णी व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे या भक्ती संगीत गायन सेवेत गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे यांनी एकल व समिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, शंभू शिवशंकर, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, तारकमंत्र आदीसह अनेक भावगीते गाऊन श्री चरणी सेवा समर्पित केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर जगदीश सोनवणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथ संगत केली. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब सरदेशमुख, राजाभाऊ सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, मल्लिनाथ बोधले, प्रा.शिवशरण अचलेर, राजू भोसले सर, रमेश शिंदे सर, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, नरसिंग क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by E city news network1
- Post by Vijay Meher1