logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोदींच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये सेवाभावाचा आदर्श; पत्रकारांचा १० लाखांचा अपघाती विमा भाजप नेते सचिन पोटरे यांचा स्तुत्य उपक्रम; ‘पत्रकार हाच खरा जनसेवक’ कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा उत्साहात साजरा होत असताना कर्जत तालुक्यात पत्रकारांच्या सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षिततेचा विचार करणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान, कर्जत यांच्या वतीने तालुक्यातील  तालुका प्रतिनिधी पत्रकारांचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे. भारतीय पोस्ट विभागाच्या विमा कंपनीमार्फत हा विमा काढण्यात आला आहे. पत्रकारांच्या कुटुंबाचीही काळजी घेतली’ पत्रकारांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “बातम्यांच्या निमित्ताने आम्ही सातत्याने दुचाकीवरून प्रवास करतो. त्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याचा विचार करून सचिन पोटरे यांनी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे,” अशी भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केवळ सत्कार किंवा शुभेच्छांपुरता कार्यक्रम न ठेवता पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष आर्थिक संरक्षण देणारा हा उपक्रम कर्जत तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श ठरला आहे. पोलीस न्यूज चे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे, गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, अफरोज पठाण, भाऊसाहेब तोरडमल, ऋषी पवार, मोतीराम शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.

1 hr ago
user_SM Rokhthok News
SM Rokhthok News
Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago
87417403-0ec6-473e-a1d8-c863d6bf65dc

मोदींच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये सेवाभावाचा आदर्श; पत्रकारांचा १० लाखांचा अपघाती विमा भाजप नेते सचिन पोटरे यांचा स्तुत्य उपक्रम; ‘पत्रकार हाच खरा जनसेवक’ कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा उत्साहात साजरा होत असताना कर्जत तालुक्यात पत्रकारांच्या सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षिततेचा विचार करणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान, कर्जत यांच्या वतीने तालुक्यातील  तालुका प्रतिनिधी पत्रकारांचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे. भारतीय पोस्ट विभागाच्या विमा कंपनीमार्फत हा विमा काढण्यात आला आहे. पत्रकारांच्या कुटुंबाचीही काळजी घेतली’ पत्रकारांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “बातम्यांच्या निमित्ताने आम्ही सातत्याने दुचाकीवरून प्रवास करतो. त्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याचा विचार करून सचिन पोटरे यांनी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे,” अशी भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केवळ सत्कार किंवा शुभेच्छांपुरता कार्यक्रम न ठेवता पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष आर्थिक संरक्षण देणारा हा उपक्रम कर्जत तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श ठरला आहे. पोलीस न्यूज चे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे, गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, अफरोज पठाण, भाऊसाहेब तोरडमल, ऋषी पवार, मोतीराम शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    2
    फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ!
कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा
कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे.
इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार
नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    30 min ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    1
    बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना
    1
    उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना
    user_Tej maharashtra varta
    Tej maharashtra varta
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    1
    शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न
आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव
    1
    फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    1
    दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    1
    आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.