logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरखेड नगर परिषदेत विशेष सभेत राजकीय खडाजंगी उमरखेड (दि. ३० मे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा समोरील पेट्रोल पंप हटविण्याच्या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता घेण्यात आलेली विशेष सभा चांगलीच गाजली. मुख्य संपादक उमरखेड वार्ता उमरखेड (दि. ३० मे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा समोरील पेट्रोल पंप हटविण्याच्या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता घेण्यात आलेली विशेष सभा चांगलीच गाजली. या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध रंगले असून, नगर परिषदेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. सभेचा पार्श्वभूमी मागील २९ जानेवारी रोजी झालेल्या विशेष सभेत नगरसेविका रुपाली सुधीर कवाने यांनी जनशक्ती पॅनेलच्या वतीने निवडणुकीत दिलेले आश्वासन पुन्हा अधोरेखित केले होते. सत्तेत आल्यानंतर उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण करण्याचे वचन दिले असून, त्याची पूर्तता करण्यासाठीच आजची विशेष सभा बोलावण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोडगीरवारांचा खोचक सवाल दरम्यान, नगरसेवक सुरेंद्र कोडगीरवार यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत विचारले की, “९० दिवसांनंतर पुन्हा त्याच विषयावर विशेष सभा घ्यावी लागते, याचा अर्थ मागील सभेनंतर कोणताही पाठपुरावा झाला नाही. ही आपली राजकीय हार समजावी का?” या प्रश्नामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नियम धाब्यावर? यावेळी शिक्षण सभापती यांनी पीठासन अधिकाऱ्यांची परवानगी न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीला स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब नाईक यांनी उघड पाठिंबा दिल्याने सभागृहात नियमबाह्य वर्तनाचा मुद्दा देखील ऐरणीवर आला. राजकीय वातावरण तापले या संपूर्ण घडामोडींमुळे नगर परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. पेट्रोल पंप हटविणे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ण करण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबितच असल्याने शहरातील नागरिकांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे लागले आहे. एकूणच, वचनपूर्तीचा दावा आणि प्रत्यक्ष कामातील विलंब यावरून नगर परिषदेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, पुढील काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

16 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    1
    शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! 
नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला 
शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले 
शेतकरी सक्षम तर देश सक्षम! 
अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा!
#SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    36 min ago
  • यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    1
    यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    16 hrs ago
  • मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    4
    मेडशी :-
अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला  गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न  करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    1
    श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat
    1
    स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ 
नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला 
या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले 
या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला 
स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! 
#SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.