प्रल्हादपुर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी* * भोकरदन:विश्वास धसाळ तालुक्यातील प्रल्हादपुर येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातील अण्णाभाऊ साठे चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे चौकात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. यावेळी उपस्थितांनी “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे”, “महामानवांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या व्यथा मांडत सामाजिक परिवर्तनाची ज्योत पेटवली. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव पाडला. त्यांच्या विचारांचा व सामाजिक कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गावातील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंती कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश देत हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.

- भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!1
- जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand1
- जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले1
- एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1