हिंदु संत आणि महिला यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे प्रा. श्याम मानव यांचा 'बुवा तेथे बाया' हा कार्यक्रम रद्द करा - हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी मुंबई। हिंदु धर्म, हिंदूंचे संत आणि संघटना यांच्यावर सातत्याने अश्लाघ्य चिखलफेक करणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांचे 'बुवा तेथे बाया' व्याख्यान हे दादर येथे होणार आहे. प्रा. श्याम मानव आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वादग्रस्त पार्श्वभूमी पहाता ते निश्चितच हिंदु संतांविषयी अवमानजनक विधाने या व्याख्यानात करतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे या व्याख्यानाला अनुमती नाकारावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली असून या विषयीचे निवेदन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, धर्माभिमानी स्वाती पांडेय, विद्या हरपुडे, सर्वश्री केतन शेंडे, विशाल ठक्कर, संतोष हरपुडे, राहुल पाटकर, सनातन संस्थेचे श्री. चंद्रकांत भदिर्के उपस्थित होते. अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणानंतर प्रा. श्याम मानव या प्रकरणाचा संदर्भ घेत सर्वच हिंदू बुवा अर्थात प्रवचनकार, संत यांच्यावर चिखलफेक करणारी विधाने करत आहेत. 'बुवा तेथे बाया' अशा प्रकारे नाव देऊन त्यांनी महिलांचाही अपमानच केला आहे. यातून सश्रद्ध महिलांना एकप्रकारे निर्बुद्ध समजून हे व्याख्यान देत आहेत. १२ मे या दिवशी सायं ५:३० वा. राजर्षी शाहू महाराज सभागृह, शिवाजी मंदिर, दुसरा मजला, दादर (प.) येथे हे व्याख्यान होत आहे. हिंदु धर्म, संत परंपरा यांविषयी द्वेष बाळगणारे मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले', हे धादांत खोटे सांगितले जात आहे’, ' १४ वर्षाचं कुलकर्ण्याचं पोर काय भिंत चालवणार?' अशा प्रकारची धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने यापूर्वीही केली आहेत. हा पूर्वानुभव पाहता श्याम मानव आताही व्याख्यानात हिंदु संतांवर बेछूट टीका करतील, तरी असे झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. महिला अंधश्रद्धेपोटी बाबा-बुवांच्या मागे लागतात, अशी सरसकट विधाने करणे, हा समस्त स्त्री-वर्गाचा अवमान आहे. एक प्रकारे स्त्रियांना चारित्र्यहीन ठरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे या व्याख्यानाला अनुमती नाकारावी, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केले आहे. जर हे व्याख्यान झाले आणि त्यात मानव यांनी आक्षेपार्ह विधाने केली, त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पोलिस प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असे हिंदू राष्ट्र समन्वय समितीने म्हटले आहे.

- मुंबई: मलाड के स्कूल में धर्मांतरण की कोशिश का आरोप, मौके पर भारी हंगामा मुंबई के मलाड इलाके में स्थित रिजॉयस इंटरनेशनल स्कूल से एक बड़ी खबर सामने आ रही है। अपुष्ट सूत्रों और मौके पर मौजूद लोगों से मिली जानकारी के अनुसार, यहाँ कथित तौर पर 700 से अधिक लोगों के धर्मांतरण का प्रयास किया जा रहा था। जब इस बात की भनक हिंदूवादी कार्यकर्ताओं को लगी और वे इसे रोकने पहुंचे, तो वहां पुलिस और कार्यकर्ताओं के बीच भारी विवाद की स्थिति बन गई। खबर है कि पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने के लिए कुछ कार्यकर्ताओं को हिरासत में लिया है। सूत्रों के मुताबिक, मेहुल और धनंजय दुबे को पुलिस ने पूछताछ के लिए बैठाया है। फिलहाल पुलिस प्रशासन पूरे मामले की गंभीरता से जांच कर रहा है। प्रशासन की ओर से इस मामले में अभी और जानकारी आना बाकी है।1
- मुंबई के विनोबा भावे नगर पुलिस स्टेशन क्षेत्र के गरीब नवाज़ बिल्डिंग के पास राशनिंग विभाग ने छापेमारी1
- दहिसर पूर्व येथे रायगड सहकारी बैंकेचे मंत्री आशीष शेलारचे हस्ते झाले1
- Thalapathy Vijay बने CM | Breaking News Thalapathy Vijay बने CM | Breaking News1
- मुंब्र्यात अमन स्पोर्ट्स क्लबने एका शानदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले, जिथे युवा खेळाडूंनी आपले कौशल्य आणि सांघिक भावना दाखवली. या यशस्वी उपक्रमामुळे स्थानिक क्रिकेटप्रेमी एकत्र आले आणि तरुणांना खेळांकडे आकर्षित केले.1
- पिंपरी-चिंचवडमधील एका पॉश सोसायटीत सुरक्षारक्षकाने चार अल्पवयीन मुलींना पाणी टंकी दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून अश्लील चाळे केले. मात्र, १० वर्षांच्या एका धाडसी चिमुकलीने घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितल्याने आरोपीला तातडीने अटक झाली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1
- पश्चिम बंगालमधील खेजुरी आणि हिजली शरीफ परिसरात ६० हून अधिक दुकाने जाळण्यात आली. या हिंसाचारात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षा दल तैनात असूनही नागरिक असुरक्षित असल्याने स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी लगेचच एक मोठा निर्णय जाहीर केला.1