logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क रहावे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी संततधार पाऊस व संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क रहावे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी संततधार पाऊस व संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 31 जुलै, : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या आणि संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले आहे. सातपुडा पर्वतीय रांगा, तोरणमाळ परिसर तसेच तापी नदी खोऱ्यातील पाण्याच्या पातळीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खालील अधिकृत मार्गदर्शक सूचना व आदेश जारी करण्यात आले आहेत. अतिवृष्टी (मुसळधार पाऊस) आणि पूरसदृश परिस्थितीत नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खालील खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. धबधबे, नाले आणि ओढे याठिकाणी घ्यावयाची काळजी म्हणून अतिवृष्टीदरम्यान धबधबे, नद्या, नाले आणि तलाव यांसारख्या पर्यटन स्थळांवर जाणे पूर्णपणे टाळावे. धबधब्यांच्या परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो (फ्लॅश फ्लड), त्यामुळे वाहत्या पाण्यात किंवा ओढ्यांमध्ये उतरू नये. नदी, नाले किंवा पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन पुढे नेण्याचा अथवा पायी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच पाण्याचा प्रवाह किंवा धबधब्यांच्या कडेला उभे राहून सेल्फी काढणे अत्यंत धोकादायक असून जीवघेणे ठरू शकते. घरामध्ये पाणी भरण्याची शक्यता असल्यास तातडीने सुरक्षित किंवा उंचावरील ठिकाणी स्थलांतर करावे. घरात पाणी शिरल्यास घरातील मुख्य वीज पुरवठा (Main Switch) आणि गॅस सिलेंडर तातडीने बंद करावा. जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती किंवा कमकुवत भिंतींच्या जवळ थांबू नये. तसेच रस्त्यावरील विजेचे खांब, उघड्या तारा किंवा डीपी (DP) पासून सुरक्षित अंतर राखावे आणि त्यांना हात लावू नये. हवामान विभागाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे. अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. रस्त्यांवर पाणी साचलेले असल्यास वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. पाण्याचा अंदाज येत नसेल तर वाहन पुढे नेऊ नये. वादळी वाऱ्यासह पाऊस असताना मोठी झाडे किंवा होर्डिंग्जखाली वाहने उभी करू नयेत अथवा थांबू नये. अतिवृष्टीच्या काळात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता असल्याने पिण्याचे पाणी नेहमी उकळून व गाळून वापरावे. घरात टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, पुरेसा खाद्यान्न साठा, आवश्यक औषधे तसेच महत्त्वाची कागदपत्रे प्लास्टिक पिशवीत सुरक्षित ठेवून इमर्जन्सी किट तयार ठेवावे. हवामानाचा अंदाज, पूरस्थिती अथवा इतर आपत्कालीन बाबींविषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत सरकारी माध्यमांवरून मिळणाऱ्या हवामान अंदाजावर आणि सूचनांवरच विश्वास ठेवावा. अतिवृष्टी व पूरसदृश परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. स्वतःची आणि कुटुंबीयांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता मानून जबाबदारीने वागावे, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

7 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
7 hrs ago
4438ae41-938e-4564-b5f6-7f8dbf374d7d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    1
    लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत....
धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस!
धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    4
    चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास 
नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    1
    संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    3 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    1
    दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 
दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून   २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद ; सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद... सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने झोडपले... तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्याची सरासरी 39 . 25 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली. तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा आधार झाला आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद सकाळी साडे सातच्या वाजेच्या पर्यंत तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 mm तर तालुक्यात आज अखेर एकूण 244.25 mm पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय पर्जन्यान मंडळातील आजच्या व एकूण झालेले पर्जन्यमान असे तळोदा मंडळात 37mm एकूण 198 mm, बोरद मंडळ 38 mm एकूण 229 mm, सोमावल मंडळ 63 mm व एकूण 283 mm, प्रतापपूर मंडळ 19 mm व एकूण 262 mm पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवस भर जोरदार पावसाने झोडपले आहे.
    1
    तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद ; सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद..
तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद...
सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद..
शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने झोडपले...
तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्याची सरासरी 39 . 25 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.
तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा आधार झाला आहे. गेल्या  चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद सकाळी साडे सातच्या वाजेच्या पर्यंत तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 mm तर तालुक्यात आज अखेर एकूण  244.25 mm पावसाची नोंद झाली आहे.  तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय पर्जन्यान मंडळातील आजच्या व एकूण झालेले पर्जन्यमान असे तळोदा मंडळात 37mm एकूण 198 mm, बोरद मंडळ 38 mm एकूण 229 mm, सोमावल मंडळ 63 mm व एकूण 283 mm, प्रतापपूर मंडळ 19 mm व एकूण 262 mm पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी  दिवस भर जोरदार  पावसाने झोडपले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सातपुड्यात चांदसैली घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प.... मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदशैली घाटात कोसळला दगडांचा खच.... सातपुड्याच्या दुर्गम भाग असल्यास धडगाव तालुक्याशी नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा घाट रस्ता बंद.... घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प.... भला मोठा दगडांचा खच वळण मार्गावरच कोसळल्याने दोडीकडील वाहतूक बंद झाल्याने प्रवासी रस्त्यातच अडकले.....
    1
    सातपुड्यात चांदसैली घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प....

मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदशैली घाटात कोसळला दगडांचा खच....
सातपुड्याच्या दुर्गम भाग असल्यास धडगाव तालुक्याशी नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा घाट रस्ता बंद....
घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प....
भला मोठा दगडांचा खच वळण मार्गावरच कोसळल्याने दोडीकडील वाहतूक बंद झाल्याने प्रवासी रस्त्यातच अडकले.....
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.