नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचे यावर्षी सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून आले आहेत. सन २०२४-२५ च्या उन्हाळ्यात जिल्ह्यात ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, परंतु सन २०२५-२६ मध्ये ही संख्या केवळ १४ वर आली आहे. प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि वेळेवर राबविण्यात आलेल्या उपायांमुळे पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची प्रगती, जलसंधारण उपक्रम आणि भूजल पुनर्भरणासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना हा या सकारात्मक बदलाचा परिणाम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांचा नियमित आढावा घेतला जात असून आवश्यक तेथे तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी रिचार्ज शाफ्टची कामे प्रस्तावित आहेत. तसेच, जी-रामजी अंतर्गत गावांमध्ये जुन्या बोअरवेल परिसरात 'जलतारा' उपक्रम राबवून भूजल पुनर्भरणाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता अधिक शाश्वत होईल. ग्रामीण आरोग्य सेवांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना नळ पाणीपुरवठा जोडणी देण्याचे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे; यात ७० पैकी ४० केंद्रांची निवड केली असून २० केंद्रांमध्ये काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात केली जात आहे. यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी संभाव्य एल-निनो परिस्थितीचा विचार करून प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. आगामी काळात जलजीवन मिशनच्या योजनांसोबतच 'शाश्वत भूजल बळकटीकरण समिती'च्या माध्यमातून जिल्हाभर व्यापक जलसंधारण व भूजल पुनर्भरणाची कामे राबविण्यात येतील. पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

- नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील माणुसपुरी गावातील मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या गंभीर स्थितीमुळे येणाऱ्या काळात प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.1
- एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत, त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणात नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार अंबादास दानवे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. नातेवाईक आणि आमदार दोघेही न्यायाच्या मागणीसाठी ठाम आहेत.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- परभणी जिल्ह्यात रेतीच्या तीव्र टंचाईमुळे अनेक घरकुलांची कामे थांबली आहेत. पाथरी, मानवत आणि सोनपेठ तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची घरे रेतीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.1
- हिंगोलीमध्ये टाटा पॉवर सोलर प्रकल्पासाठी कथित विनापरवाना वृक्षतोड झाल्याचा आरोप करत, याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी सुनील माने यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ही वृक्षतोड अनधिकृत असल्याचा दावा करत, माने यांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या उपोषणाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला असून, संबंधित वृक्षतोडीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. हिंगोलीतील या कथित अनधिकृत वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, सुनील माने यांच्या आंदोलनामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.1
- पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी ऑटो चालकांसाठी सक्त सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, सर्व ऑटो चालकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आणि विहित ड्रेस कोडचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असेही पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे ऑटो चालकांनी सावधानता बाळगावी.1
- लोहा कंधार येथे 23 रोजी बौद्ध बांधवांकडून 'यलगार जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, बुद्ध संघटना आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.1
- शिवकुमार काळे यांच्या माहितीनुसार, नांदेडच्या बाफना रोड परिसरातील कविता हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका इलेक्ट्रिक AC दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग अत्यंत भयंकर स्थितीत असून, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही आणि या घटनेसंबंधीची अधिक माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अजून कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध झाली नसल्याचे दिसून येत आहे.1