अहमदपूर तालुक्यातील मौजे शिरूर ताजबंद येथे महादेव पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न भक्तीचा महासागर लोटला; शिरूर ताजबंद येथे राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न अहमदपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे शिरूर ताजबंद येथील श्री क्षेत्र महादेव (ओमकारेश्वर) मंदिरात रविवार, दिनांक ३० मार्च रोजी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याचे सहकार मंत्री तथा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नामदार बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच परिसरातील हजारो भाविकांनी या अलौकिक सोहळ्याचा आनंद घेतला. शिरूर ताजबंद येथील या प्राचीन आणि जागृत देवस्थानच्या परिसरात काल सकाळपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. मंदिराच्या गाभाऱ्याला आणि परिसराला अतिशय आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी शुभ मुहूर्तावर 'मंगल सावधान'च्या जयघोषात शिव-पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला, तेव्हा संपूर्ण परिसर 'हर हर महादेव' आणि 'ओम नमः शिवाय'च्या गजराने दुमदुमून गेला होता. याप्रसंगी ना. बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मंदिराच्या विकासासाठी आणि परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी देवस्थान कमिटी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या सोहळ्यासाठी केवळ शिरूर ताजबंदच नव्हे तर अहमदपूर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. निसर्गरम्य शेतपरिसरात असलेल्या या मंदिरात पार पडलेला हा सोहळा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by Mohammad Rafikh1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1