तळेगाव दाभाडे येथे ‘प्रेमगंध’ ध्यान शिबिराची ऊर्जा; हजारो साधकांनी अनुभवला अंतर्मनाचा प्रवास “स्वतःशी भेट घ्या, आनंदी जीवन जगा” – गुरुदेव मनोजजी जैन यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी तळेगाव दाभाडे येथे ‘प्रेमगंध विश्व’ आयोजित एक दिवसीय ध्यान साधना शिबिर उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला साधकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत तब्बल १००० हून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत अंतर्मनाशी संवाद साधण्याचा अनोखा अनुभव घेतला. शिबिराच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि आनंदी जीवनाची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात माँ विदेहीजी यांनी ध्यान साधनेचे महत्त्व स्पष्ट करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. योग्य पद्धतीने श्वास घेणे आणि सोडणे यामुळे शरीर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम त्यांनी उदाहरणांसह सांगितले. “श्वास हा जीवनाचा पाया आहे, तो योग्य पद्धतीने घेतल्यास जीवनात स्थैर्य आणि शांतता येते,” असे त्यांनी नमूद केले. उपस्थित साधकांकडून प्रत्यक्ष साधना करून घेतल्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. या शिबिराला ‘प्रेमगंध विश्व’चे संस्थापक गुरुदेव श्री. मनोजजी जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “स्वतःला वेळ देणे आणि स्वतःवर प्रेम करणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ध्यान साधनेमुळे भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक-शारीरिक आरोग्य सुधारते.” त्यांनी पुढे सांगितले की, “भगवंताला शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही; तो आपल्या आतच आहे. त्यासाठी प्रथम स्वतःशी भेट घेणे आवश्यक आहे.” या शिबिराचे नियोजन तळेगावातील साधिका सौ. मीना दाभाडे, सौ. जयश्री सावंत, श्री. शंकर काका रागमहले, श्री. बाळासाहेब दाभाडे, श्री. सुनील किर्वे, श्री. सोमनाथ ननावरे आणि सौ. पायल कुलकर्णी यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. स्थानिक साधकांनीही उत्स्फूर्त सहकार्य करत कार्यक्रमाच्या यशात मोलाची भूमिका बजावली. शिबिराच्या शेवटी साधकांनी आपले अनुभव मांडताना ध्यान साधनेमुळे मानसिक हलकेपणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. अनेक नवीन साधकांनीही या साधनेचा लाभ झाल्याचे नमूद करत पुढील शिबिरांविषयी उत्सुकता दर्शवली. कार्यक्रमाला तळेगाव व परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पंचायत समिती सदस्या सौ. शुभांगीताई ढोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माँ प्रमोदिनीजी यांनी केले. या ध्यान शिबिराविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०६७७५०६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

- वरुडमध्ये शेतातील नाल्यात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला1
- आठवले साहेबांच्या आदेशाने निवडणुकीत काम केलं 'आरपीआय वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख1
- पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange3
- पुण्यात पावसाचा तडाका पुणेकर गाराठले भर उन्हात पावसाचा तडाका1
- Post by Kishor subhash jadhav1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- पिंपरी-चिंचवडमध्ये RPI आठवले गटाची महत्त्वाची बैठक; शहराध्यक्ष बदलाचा अधिकार फक्त रामदास आठवले यांनाच – चंद्रकांता सोनकांबळे यांचा ठाम इशारा1