logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रिक्षा चालकांच्या संघर्षाला न्याय; ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरणावर राज्य सरकारचा ब्रेक डॉ. बाबा कांबळे यांच्या चार वर्षांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश; लाखो रिक्षा चालकांना दिलासा पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी राज्यातील रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम करणाऱ्या ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरणावर अखेर राज्य सरकारने ब्रेक लावला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला असून रिक्षा व्यवसायाला पुन्हा शिस्त मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी गेल्या चार वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला आणि पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. रिक्षा चालकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन या धोरणाविरोधात राज्यभर आवाज उठवला जात होता. मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. अनेक रिक्षा चालकांना रोजच्या खर्चासाठीही संघर्ष करावा लागत होता. २०१७ मध्ये सरकारने ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरण लागू केल्यानंतर रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये रिक्षांची वाढ नियंत्रणाबाहेर गेली. पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वी सुमारे पाच हजार रिक्षा होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या तब्बल पन्नास हजारांच्या घरात पोहोचली. पुणे शहरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून रिक्षांची संख्या ४० हजारांवरून थेट दीड लाखांपर्यंत गेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, आधीच्या सुमारे सहा लाख परवान्यांमध्ये आणखी चौदा लाख नवीन परवान्यांची भर पडल्याने रिक्षा व्यवसायात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. परिणामी, प्रत्येक रिक्षा चालकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली. या परिस्थितीचे वर्णन करताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “एकाच भाकरीचे अनेक तुकडे झाल्यामुळे कोणाचेच पोट भरत नव्हते. रिक्षा चालकांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते.” या धोरणाविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि विविध रिक्षा चालक-मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडे अनेकदा निवेदने देण्यात आली. तसेच या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे आकडेवारीसह सादरीकरण करून सरकारला परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. रिक्षा चालकांच्या हक्कासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा करताना आंदोलने, बैठका आणि चर्चांद्वारे हा प्रश्न सातत्याने सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आला. राज्य सरकारने ‘मुक्त रिक्षा परवाना’ धोरण बंद करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले, “हा निर्णय थोडा उशिरा झाला असला तरी ‘देर आये दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे तो योग्य वेळी झाला आहे. यामुळे रिक्षा व्यवसायात पुन्हा शिस्त निर्माण होईल आणि रिक्षा चालकांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.” या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून भविष्यातही रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षा चालकांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची आशा व्यक्त केली जात असून रिक्षा व्यवसायाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

16 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago
292da676-870d-4fce-9733-1a5f972158ab

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान
    1
    चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    1
    जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल
    1
    -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते
-आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे
-आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत
-सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल
-महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! : अद्या उर्फ सायली सुर्वे #सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद #SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute
    1
    पिंपरी चिंचवड : -
लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! 
: अद्या उर्फ सायली सुर्वे
#सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद
#SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    55 min ago
  • आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।
    1
    आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।
    user_VSK vyas
    VSK vyas
    Pune City, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by R A News
    1
    Post by R A News
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.