शिवजयंतीसाठी बुलढाणा सज्ज : जिल्ह्यात ‘ड्राय डे’चा कडक आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई! शिवजयंतीसाठी बुलढाणा सज्ज : जिल्ह्यात ‘ड्राय डे’चा कडक आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई! शेगांव / बुलढाणा | प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात जल्लोषाचे वातावरण असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला असून सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने, बिअर बार तसेच परवाना कक्ष पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहेत. शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांनी साजरा होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सर्व मद्यविक्री व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवजयंतीचा उत्सव पारंपरिक जल्लोषात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभाग सज्ज झाले असून संपूर्ण जिल्ह्यात कडक नजर ठेवली जाणार आहे. शिवरायांच्या जयंतीचा उत्साह… पण नियमांचे पालनही तितकेच आवश्यक!

- खामगाव : शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला. मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.4
- 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Raghunath Aghao1
- खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. काल रात्री च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दुर्दैवी घटनेत घरातील एका मुलीला दुखापत झाली आहे. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला.ही घटना घडल्यानंतर शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केली. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या किंवा धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांची गर्दी जमा झाली होती. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख व्यक्तींची तातडीची बैठक घेतली. "ही घटना दोन समाजातील नसून वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना समज दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी जनतेला खालील बाबींचे आवाहन केले आहे: अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नका. उद्या शिवजयंतीचा मोठा सण आहे. हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, अफवा पसरवणाऱ्या आयडीवर सायबर सेलचे बारीक लक्ष असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये.3