मका खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा; विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा मका खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा; विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा आ. सुधीर मुनगंटीवार यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे ; हमीभावासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा शासनाकडे ठाम पाठपुरावा चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आता जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मका लागवड होऊन चांगले उत्पादन झाले असतानाही शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. छगन भुजबळ यांना पत्र पाठवून तातडीने मका खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. आ. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शासनाने हमीभावाने मका खरेदी करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात संबंधित विभागीय अधिकारी आणि यंत्रणा या प्रक्रियेबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपला मका अत्यल्प दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बाजारात सध्या मक्याला शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मका खरेदीची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही खरेदी केंद्र प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. या विलंबामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून खरेदी प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईसाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.तसेच शेतकऱ्यांना हमीभावाने तातडीने मका विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणेला त्वरित आदेश द्यावेत आणि याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी विनंतीही त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत कायम संवेदनशील असलेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही तातडीने वाचा फोडली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या मक्याला योग्य भाव मिळावा, त्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीवर अवलंबून राहावे लागू नये आणि शासनाच्या हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी त्यांनी शासनाकडे ठाम पाठपुरावा सुरू केला आहे. “शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे,” अशी भूमिका घेत त्यांनी प्रशासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

- डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ.. शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!1