पाबळ - मलठण परिसरात नव्या एमआयडीसीच्या स्थापनेला वेग; ७४३ हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव पाबळ प्रतिनिधी | तेजस वाळुंज शिरूर आणि खेड तालुक्यातील दुष्काळी भागाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) मोठे पाऊल उचलले असून पाबळ-धामारी परिसरातील ७४३ हेक्टर जमिनीवर नवी एमआयडीसी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भूसंपादनाकरिता राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केले असून संबंधित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांवर ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा टाकण्यात येत आहे. या नव्या प्रस्तावित एमआयडीसीत आयटी आणि ऑटोमोबाईल उद्योग असणार असल्याने आयटी हब चाकण आणि आयटी पार्क हिंजवडीला पर्याय मिळणार आहे. तेथील पायाभूत सुविधांअभावी स्थलांतर करणाऱ्या उद्योगांना जवळच नवा पर्याय मिळणार आहे. या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राला रस्ते आणि बंदरांशी उत्तम जोडणी मिळणार असून प्रस्तावित पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग याच भागातून जाणार आहे. याशिवाय शिरूर-कर्जत-उरण महामार्गामुळे हे क्षेत्र थेट जेएनपीटी बंदर आणि मुंबईशी जोडले जाणार असल्याने मालवाहतूक अधिक जलद होईल. त्याकरिता तलाठ्यांमार्फत ‘नमुना ९’ अंतर्गत सूचना जारी केली आहे. त्यानुसार नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना आपल्या हरकती किंवा सूचना तलाठी कार्यालयात लेखी किंवा तोंडी स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. त्यावरील सुनावणीनंतर जमिनीचा योग्य मोबदला निश्चित करून प्रत्यक्ष भूसंपादन केले जाईल. दरम्यान, काही बागायती जमिनीवर शिक्के पडल्याने त्याला मोठा विरोध झाला आहे. त्यावर बोलताना शिरूरचे प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी पुढील प्रक्रिया तात्काळ होणार नाही, असे सांगत शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच ती अवलंबून असेल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे पाबळ परिसरातील ७४३ हेक्टर क्षेत्रावर नोंद घेण्याची कारवाई झाली असून पुढील सर्व अधिकार प्रांताधिकारी व MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना आहेत, असे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये : एकूण क्षेत्रफळ: ७४३ हेक्टर (१८३६ एकर) – पहिला टप्पा बाधित गावे: पाबळ, खैरेनगर, धामारी आणि मलठण हद्द प्राधान्य उद्योग: ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि आयटी अपेक्षित परिणाम: हजारो रोजगारांची निर्मिती व परिसराचा औद्योगिक विकास

- "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"1
- समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली1
- Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा1
- केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.1
- SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप1
- “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”1
- "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"1
- शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1